Jayant Patil On NCP Crisis : Sarkarnama
पुणे

Jayant Patil On NCP Crisis : खासदार कोल्हेंना उशीर अन् पाटलांनीच लढवला किल्ला...

Jayant Patil On NCP Crisis : "जे गेले त्यांचा विषय संपला..."

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पिंपरी-चिंचवडमधील कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (ता.२) रात्री प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे येईपर्यंत त्यांना आपले भाषण वाढवत राहावे लागले. त्यामुळे ते अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे असूनही त्यांचे नाही, तर खासदार कोल्हेंचे भाषण शेवटी होण्याची दुर्मीळ अन् अनोखी घटना घडली. (Latest Marathi News)

पाटील यांचे भाषण सुरू असताना खासदार कोल्हे आले. त्यावेळी त्यांनी तुमच्यासाठीच भाषण लांबवत होतो, किल्ला लढवला, असे को्ल्हेंकडे पाहत सांगताच सभेत हशा झाला. लोकसभेत हिंदीत उत्कृष्ट मांडणी करणारा , बैलगाडा शर्यतीला जीवदान देणारा खासदार असे कोल्हेंचे त्यांनी कौतुक केले.

या वेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अॅड. जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, महिलाध्यक्षा ज्योती निंबाळकर, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर आदी व्यासपीठावर होते. शहराची जबाबदारी असलेले पक्षाचे आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेत असल्याने त्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचा बहुतांश पक्ष हा अजित पवारांसोबत गेल्याने सभेत अगोदर भाषण केलेल्या सर्वांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हाच धागा पकडत तिकडे गेलेल्यांची नाही, तर राहिलेल्यांची मी चिंता करतो, असा धीर पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीच दिला. गेलेल्यांचा विषय संपला असून, राहिलेले साथ देताहेत त्यांचे संघटन करा, नवे कार्यकर्ते उभे करा, असा सल्ला त्यांनी दिला.

सत्ता कशीही मिळवता येते, पण जनता ते मान्य करीत नाही, असा टोला पाटील राज्यातील युती सरकारात सामील झालेल्या पक्षाच्या अजित पवार गटाला लगावला. तसेच, आता जो राज्यात राजकीय बदल झाला आहे, त्यातही पुन्हा बदल होऊ शकतो, असे भाकीत त्यांनी केले.

पुणे पक्षाध्यक्ष जगतापांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यांकडून पिंपरीत कौतुक -

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या वेळी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ता असावा, तर असा या शब्दांत कौतुक केले. त्यांचे राज्यभर मी उदाहरण देत असतो, असे ते म्हणाले. कारण पक्षफुटीच्या वेळी जगतापांनी सांगितले होते, की तुम्ही तिकडे जाणार असाल, तर मी येणार नाही. तत्त्व आणि विचार वेगळे आहेत, असे ते ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांचे मोठे कौतुक वाटले, असे पाटील म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT