Loksabha Election-2024 : राष्ट्रवादीचा मुंबईतील एकमेव लोकसभा मतदारसंघही ठाकरे गट लढवणार?; उमेदवाराची केली घोषणा

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना नेते उद्धव ठाकरे गटाकडे असावा, असा आमचा आग्रह आहे.
Sanjay Patil
Sanjay PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मिळणाऱ्या एकमेव लोकसभा मतदारसंघावरही आता शिवसेनेने दावा केला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. समोपचाराने ही जागा आम्ही मागून घेऊ आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली. (Thackeray group to contest Northeast Mumbai Lok Sabha seat; Name of candidate was also announced)

लोकसभा निवडणुकीची ठाकरे गटाकडून मुंबईत जोरदार तयारी करण्यात येत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावे आणि सभा घेण्यात येत आहे. भांडूप येथे रविवारी सायंकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातील कोकणवासीयांचा मेळावा पार पडला. त्यावेळी राऊत यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघाबाबत भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Patil
Koyna water Issue : पश्चिम महाराष्ट्रातही पाणी पेटणार, संजयकाकांबाबतची नाराजी फडणवीसांना सांगणार; देसाई

महाविकास आघाडीत अजून लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाचा फार्म्युला ठरलेला नाही. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना नेते उद्धव ठाकरे गटाकडे असावा, असा आमचा आग्रह आहे. या मतदारसंघाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

वास्तविक, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मुंबईमध्ये ईशान्य मुंबई हा एकमेव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आलेला आहे. या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन निवडणुका लढवल्या आहेत. त्यात २००९ मधील निवडणुकीत संजय दिना पाटील यांनी विजय मिळविला आहे, त्यामुळे मुंबईत ईशान्य मुंबई हा एकमेव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो.

Sanjay Patil
Food Excellence Center : अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार, बारामतीला नेणार नाही; अजितदादांचे स्पष्टीकरण

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर आता शिवसेनाही आली आहे. या तीन पक्षांनी एकत्र येत २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आली होती. आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात तीनही पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. शिवसेनेने मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यातून मेळावे आणि सभा घेण्यात येत आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने ईशान्य मुंबईवर दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुंबईतील एकमेव मतदारसंघही सोडला तर त्याचा परिणाम पक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यावर होतो. ईशान्य मुंबई शिवसेनेला सोडला तर मुंबईतील इतर कोणता मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येतो, हे पाहावे लागेल.

Sanjay Patil
OBC Melava : भुजबळसाहेब, आम्ही तुमच्याबरोबर युती करू, पण त्यांच्याशी नाही; जानकरांचा इशारा कोणाला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com