Pradeep Kand-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Shirur Loksabha Constituency : शिरूर लोकसभेसाठी अजितदादांचा मोठा डाव; बडा नेता लवकरच करणार घरवापसी

NCP News : जुन्नरचे आमदार अतुल बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी त्या बड्या नेत्याच्या नावावर सहमती दर्शविली आहे.

Vijaykumar Dudhale

Pune News : शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. एकेकाळचे निष्ठावंत आणि सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना शिरूरच्या मैदानात उतरविण्याचा चंग अजितदादांनी बांधला आहे. त्यासाठी कंद हे लवकरच घरवापसी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Loksabha Election 2024)

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी उमेदवारही तेवढाच तुल्यबळ असावा, यासाठी चाचपणी सुरू आहे. त्या दृष्टीने अजित पवार गटाकडून मोठी घडामोड घडत असल्याचे पुढे येत आहे. एकेकाळचे अजितदादांचे निष्ठावंत सध्या भारतीय जनता पक्षात असलेले प्रदीप कंद यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी विचारणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कंद यांच्याशी अजित पवार यांची चर्चा झाली आहे. (Ajit Pawar NCP Party)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे प्रदीप कंद येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजितदादांनी प्रदीप कंद यांना लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारणा केली आहे. प्रदीप कंद यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे. त्यांच्याकडून होकार आल्यानंतर कंद यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि लोकसभा उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Pradeep Kand news)

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेड, भोसरी, शिरूर-हवेली आणि हडपसर हे मतदारसंघ येतात. यातील पाच मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. त्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कंद यांच्या नावावर सहमती दर्शविली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून प्रदीप कंद यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.

दरम्यान, प्रदीप कंद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुशीत वाढलेले नेते आहेत. ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांना राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्ष बनवले होते. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांना शिरूरमधून उमेदवारीची अपेक्षा हाेती. मात्र, त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर कंद यांनी 2019 च्या निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यामुळे कंद हे अजूनही अजितदादांचे समर्थक म्हणूनच ओळखले जातात.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT