Sharad Pawar : अजित पवारांचे पुतणे तुमच्याबरोबर आले तर स्वागत करणार का? शरद पवार म्हणाले, "कुणी..."

Sharad Pawar On Ncp Party : "राष्ट्रवादी पक्षाची स्थापना मी केली, पण...", असंही शरद पवारांनी म्हटलं.
Sharad pawar yugendra pawar ajit pawar
Sharad pawar yugendra pawar ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली आहे. अशातच अजित पवारांच्या पुतण्यानं शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलं आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार शरद पवार यांच्याबरोबर जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावर आता शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

Sharad pawar yugendra pawar ajit pawar
Rohit Pawar News: 'बैलाकडे पाहून कळतं प्रामाणिक कसं राहावं, लोक आपल्या काकांनाही विसरतात; रोहितदादांचा रोख कुणाकडे

बारामतील नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "कुटुंबात मला एकटे पाडले जात आहे," असं वक्तव्य केलं होतं. त्यातच आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आज ( 21 फेब्रुवारी ) बारामतीतील शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. यामुळे बारामतीतील राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युगेंद्र पवार यांनी अजित पवारांची साथ सोडत तुमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी कोल्हापुरात शरद पवारांना विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, "युगेंद्र पवार राजकारणात होते, हेच मला माहिती नव्हतं. युगेंद्र व्यावसायिक आहेत. युगेंद्र अमेरिकेत शिकून आले असून राजकारणात नसतात."

युगेंद्र तुमच्याबरोबर आले तर स्वागत होईल का? या प्रश्नावर शरद पवारांनी म्हटलं, "कुणी एखादी भूमिका घेतली, तर त्याबद्दल वेगळं मत व्यक्त करण्याचं कारण नाही. कुठेही काम करण्याचा त्यांना अधिकार आहे."

Sharad pawar yugendra pawar ajit pawar
Sharad Pawar : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामागचं शरद पवारांनी सांगितलं 'कारण', म्हणाले...

"राष्ट्रवादी पक्षाची स्थापना मी केली. तो पक्ष आणि आमचं घड्याळ चिन्ह आमच्या हातातून काढून दुसऱ्याला दिलं. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. सुदैवानं देशातील न्यायव्यवस्थामुळे कुठेही आम्हाला जात येते. त्यामुळे काही प्रश्न सोडवता येतात," असं शरद पवारांनी सांगितलं.

Sharad pawar yugendra pawar ajit pawar
Maratha Arakshan Vishesh Adhiveshan : शिंदे सरकारचा सुपरस्ट्रोक; पण हा प्रश्न अनुत्तरीतच...

"निवडणूक आयोगाच्या कामात सुधारणा करण्याची गरज असल्याचं पत्र आम्ही लिहिलं होतं. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाला भेट मागितली होती. पण, नंतर आयोगाचं सहा पानाचं पत्र आलं. त्यात भेटण्याची आवश्यकता नाही, असं सांगण्यात आलं," असंही शरद पवारांनी म्हटलं.

Sharad pawar yugendra pawar ajit pawar
Ravikant Tupkar News : आंदोलनांच्या दणक्यामुळे मिळतेय शेतकऱ्यांना मदत !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com