Indapur News : इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार यांची गाडी सुसाट सुटते. आजही त्यांची गाडी सुसाट सुटली होती. मात्र, स्टेजवर सुनेत्रा पवार, तर खाली प्रेक्षकांमध्ये त्यांचे चिरंजीव जय पवार बसले होते, त्यामुळे दादांनी आपल्या गाडीला जरा ब्रेक लावला. ‘मला जरा आज बोलायला मर्यादा आहेत. समोर कारटं बसलंय आणि मागं बायको बसलीय. ती दोघं नसती तर तुला सांगितलं असतं,’ असे मिश्किल उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. (NCP News)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (ता. २५ फेब्रुवारी) इंदापूर येथे शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्याला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार, आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि प्रेक्षकांमध्ये अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार बसले होते. त्यामुळे अजित पवार यांनी भाषणात बोलताना पत्नी सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीचा उल्लेख केला. (Baramati Loksabha)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार म्हणाले, मी गेली ३० ते ३५ वर्षे राजकारणात काम करतो आहे. मला सगळ्या गोष्टींची जाण झालेली आहे. मी कुठल्याही कामात तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, हे सांगताना त्यांनी इंदापूर तालुक्यातील द्राक्षाच्या बाबत घडलेला किस्सा सांगितला. ग्रेप्स इंडस्ट्रीजने अचानक सांगितलं की, आम्ही द्राक्ष घेणार नाही. त्यावर मी मुंबईत तातडीने बैठक बोलावली. ती ग्रेप्स कंपनी परदेशी होती. पण, सरकारमध्ये असल्यामुळे एक्स्जाईजच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांना बोलावून घ्या. कंपनीच्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगितलं की, इंदापूर-बारामती तालुक्यातील द्राक्ष घेतलीच पाहिजे. त्यांनी द्राक्षं घेतली आणि भावही वाढवून दिला. हे बाकीच्यांना कोणाला जमलं नाही.
मी म्हणतो ना प्रत्येकाचा काळ असतो. चार दिवस सासूचे असले तरी चार दिवस सुनेचे येतातच ना. तसंच आमचं आहे. आता चार दिवस सासवांचे गेले आहेत, आता सुनांचे दिवस आले आहेत. अर्थात तुम्ही बटन दाबलं तर... असं दादा म्हणाले. तेवढ्यात खालून ‘दाबणार दादा....दाबणार. बटण काळं निळं होईपर्यंत दाबणार, असं एक कार्यकर्ता म्हणाला. त्यावर अजितदादांनीही तेवढं नको दाबू, हळूच दाब. कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको, असं अजित पवार सांगत होते.
आपली मराठी संस्कृती आपल्याला काय सांगते. मला जरा आज बोलायला मर्यादा आहेत. समोर कारटं बसलंय आणि मागं बायको बसलीय. ती दोघं नसतं, तर तुम्हाला सांगितलं असतं... पण, आपण आपल्या घरात बोलतोय. नाही तर ह्यांची ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.