Nanded Politics : अशोक चव्हाणांसोबतची कटुता संपली; कट्टर विरोधकाने दिली ग्वाही...

Pratap Patil Chikhlikar Vs Ashok Chavan : रामकथेच्या माध्यमातून चिखलीकरांना दिल्लीची वारी दुसऱ्यांदा होणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar
Ashok Chavan-Pratap Patil ChikhlikarSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी नांदेड शहरात प्रख्यात कथाकार जयाकिशोरीजी यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (ता. 25 फेब्रुवारी) पार पडले. याच कार्यक्रमात चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यासोबतची आपली कटुता संपल्याची ग्वाही दिली आहे. या रामकथेच्या माध्यमातून चिखलीकरांना दिल्लीची वारी दुसऱ्यांदा होणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Nanded Loksabha News)

नांदेड लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांचा पराभव करून जायंट किलर ठरले होते. ही त्यांची दिल्लीची पहिली वारी होती. त्यांनी दुसऱ्यांदा दिल्ली गाठण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नांदेड शहरात त्यांच्या वतीने दोनदिवसीय राम व कृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या उद्‌घाटन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते. (BJP Leader)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar
Nanded BJP : खासदार प्रताप चिखलीकरांचे विरोधक चव्हाणांच्या गोटात?

या कार्यक्रमातील भाषणात अशोक चव्हाण यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले. पण, प्रवीण पाटील चिखलीकर व‌ खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी राजकीय भाष्य केले. खासदार चिखलीकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अशोक चव्हाण यांच्याशी आपला वाद हा राजकीय स्वरूपाचा होता. आता अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करून भाजपत प्रवेश केला आहे, त्यामुळे आमच्यातील कटुता संपली आहे, असेही चिखलीकरांनी स्पष्ट केले. (Marathi Political News)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलीकरांनी विविध माध्यमांतून वातावरणनिर्मिती केली आहे. त्यांनी उमेदवारी मलाच मिळणार व मोठ्या मताधिक्याने निवडूण येणार, असा दावा केला आहे.

Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar
Devendra Fadnavis and Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत फडणवीसांकडून 'सस्पेन्स' कायम, म्हणाले...

भाजपला मिशन 45 चे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. यात नांदेडच्या जागेचाही समावेश आहे. नांदेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या सत्संगाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या सत्संगाच्या माध्यमातून चिखलीकरांना दिल्लीची वारी दुसऱ्यांदा होणार काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar
Ajit Pawar Speech : ‘समोर कारटं अन्‌ मागं बायको बसलीय...नाय तर तुला सांगितलं असतं’; अजितदादांची पुन्हा मिश्किली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com