supriya sule meet sunetra pawar sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : बारामतीत एकीकडे खडाजंगी, दुसरीकडे नणंद-भावजयीच्या गळाभेटीनं चर्चांना उधाण

Akshay Sabale

लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच बारामती मतदारसंघ ( Baramati Lok Sabha Constituency ) राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार ( Sharad Pawar ) आणि अजित पवार ( Ajit Pawar ) असं दोन गट झाल्यानं राजकारणात घडामोडी घडत आहेत. बारामती लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) या उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. तसा प्रचारही सुनेत्रा पवार यांनी सुरू केला आहे. यातच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली आहे.

बारामतीमधील जळोची येथे महाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी संयोजकांनी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) आणि सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांना निमंत्रित केलं होतं. शुक्रवारी ( 8 मार्च ) रात्री साडेनऊच्या सुमारास प्रथम सुनेत्रा पवार कार्यक्रमस्थळी आल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे तेथे आल्या. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांना पाहताच गळाभेट घेत हसून स्वागत केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारच उमेदवार असतील, असं सांगितलं जात आहे. त्यादृष्टीनं सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

दरम्यान, गेल्या 3 दशकांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. सुप्रिया सुळे सलग 3 वेळा बारामतीतून निवडून गेल्या आहेत. पण, जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. त्यानंतर राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार यांच्याकडे गेला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत एकमेकांसमोर असणार आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT