Pune News, 11 May : बारामती लोकसभा निवडणुकीच्या ( Baramati Lok Sabha Election 2024 ) आदल्या दिवशी रात्री पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवणं मॅनेजरला चांगलेच महागात पडलं आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या ( PDCC Bank ) भोर येथील मॅनेजरवर निवडणूक आयोगानं निलंबनाची कारवाई केली आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) विरुद्ध सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्यातील 'हायव्होल्टेज' लढत मतदानाच्या शेवटपर्यंत सुरू होती. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या वेल्हे येथील शाखेतून पैसे वाटल्याचा आरोप आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा 6 मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याचा व्हिडीओ समाजामाध्यमावर टाकत रोहित पवार यांनी पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता. त्यासह निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. याची दखल घेत आयोगानं वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
निवडणूक आयोगाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर बँक मॅनेजरशी संपर्क साधण्यात आला. पण, मॅनेजरकडून कोणतंही सहकार्य करण्यात आलं नाही. त्यानंतर आयोगानं बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात काही 40 ते 50 कर्मचारी बँकेच्या बँकेमध्ये आढळून आले. हेच प्रकरण मॅनेजरला भोवलं असून आयोगानं थेट निलंबनाची कारवाई केली आहे.
रोहित पवार यांचं ट्वीट काय?
"PDCC बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय.... आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे... कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा... निवडणूक आयोग दिसतंय ना? सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल," असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.