'मी पुन्हा येईन' म्हटलं होतं. पण, त्यासाठी अडीच वर्षे लागली. अडीच वर्षांनी दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन आलो, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "पक्ष फोडणाऱ्यांना कार्यकर्ते योग्य जागा दाखवणार," असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. ते एका मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले, "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) एका ठिकाणी सांगितलं की, मी दोन पक्ष फोडून आलो याठिकाणी आलो आहे. मग काय कर्तृत्व आणि काय काम केलं? खऱ्या अर्थानं माणूस जोडण्याचं आणि ऐक्याचं काम करतो. त्याच्याबद्दल आदर सांगत असतो. पण, पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना हजारोंच्या नाहीतर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि कार्यकर्ते योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"बारामती लोकसभेची जागा लोकांच्या हातात"
"आपल्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर आपण नक्की यश मिळवू. नक्की जास्ती जागा जिंकू. बारामती लोकसभेची जागा तुम्हा लोकांच्या हातात आहे. तुमच्या कष्टानं बारामतीत नक्की यश संपादन करू. बारामतीकडे सुदैवानं देशाचं लक्ष आहे. याचा अर्थ तुमच्या कर्तुत्वाची, हिंमतीची नोंद देश पातळीवर घेतलेली आहे," असं शरद पवारांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
"मी पुन्हा येईन' हे फक्त वाक्य नव्हतं. त्यात मी कशासाठी, कुणाची सेवा करण्यासाठी 'मी पुन्हा येईन' हे सांगितलं होतं. यातून फक्त 'मी पुन्हा येईन' हेच वाक्य लोकांनी घेतलं. ही कविता कुणी बंगाली आणि इंग्रजीत भाषांतर केली. 2019 मध्ये लोकांनी आम्हाला निवडून दिलं. मात्र, सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) आमच्या पाठीत खंजीर खुपसला. 'हे अहंकारी होते म्हणून यांचं सरकार आलं नाही,' असं जनतेनं आम्हाला म्हटलं. पण, राजकारणात हे चालूच राहिते. मी पुन्हा येईन म्हटलं होतं. त्यासाठी अडीच वर्षे लागली. अडीच वर्षांनी मात्र दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन आलो," असं फडणवीस म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.