sharmila pawar sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : "खावा कुणाचं बी मटण, दाबा तुतारीचं बटण, नाही तर...", शर्मिला पवारांचा सुळेंसाठी प्रचार

Sharmila Pawar On Supriya Sule : "सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आहे", असं शर्मिला पवारांनी म्हटलं आहे.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) तारखा जाहीर झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात ( Baramati Lok Sabha Constituency ) राजकीय हालाचालींना वेग आला आहे. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार ( sunetra Pawar ) या नणंद भावजयीमध्ये थेट होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसा प्रचारही दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी घेतलेल्या निर्णय कुटुंबातील व्यक्तींना पसंत पडलं नाही. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, पुतण्या युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार, आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहेत.

यातच शर्मिला पवार सुप्रिया सुळेंच्या ( Supriya Sule ) प्रचारासाठी आज रविवारी ( ता.25 मार्च ) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. या वेळी शर्मिला पवार ( Sharmila Pawar ) यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. "खावा कुणाचंही मटण दाबा फक्त तुतारीचं बटण," असं आवाहन शर्मिला पवार यांनी जनतेला केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"नाहीतर पाच वर्षे मोकळंच बस्सा"

शर्मिला पवार म्हणाल्या, "मटण, बोकड जेवायला येण्याचं आमिष दाखवलं जाईल. पण, खावा कुणाचंही मटण दाबा फक्त, तुतारीचं बटण. नाहीतर एक वाटी रस्सा आणि पाच वर्षे मोकळंच बस्सा."

"सुळेंना पुन्हा संसदेत पाठवायचंय"

"शरद पवारांची ( Sharad Pawar ) पुण्याई सुप्रिया सुळेंच्या पाठीशी आहे. पण, कधीही सुळेंनी पवार नावाचा वापर आपल्या राजकीय कामासाठी केला नाही. निवडून द्यायचं की नाही द्यायचं हा जनतेचा अधिकार आहे. आज मुखात श्री राम म्हणतो. घराघरात रामायण आणि महाभारत सुरू आहे. मात्र, आपल्या लेकीला पुन्हा एकदा संधी द्यावी. सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आहे," असं शर्मिला पवारांनी म्हटलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT