बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ( Baramati Lok Sabha Election 2024 ) महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही. पण, सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) या नणंद-भावजयीमध्येच लढत होणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यादृष्टीनं राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून प्रचारही केला जात आहे, तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, आमदार रोहित पवार, श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार या सुप्रिया सुळेंचा प्रचार करत आहेत.
सोमवारी ( ता.25 ) शर्मिला पवार ( Sharmila Pawar ) इंदापूर दौऱ्यावर होत्या. या वेळी शर्मिला पवार यांनी नाव न घेता अजित पवारांना ( Ajit Pawar ) टोला लगावला आहे. "चुलत्याच्या पुढं जायचं नाही," असं म्हणत शर्मिला पवारांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नेमकं काय म्हणाल्या शर्मिला पवार?
"मी रवींद्रला सांगितलं चुलत्याच्या पुढं जायचं नाही. तू सरपंच, पंतप्रधान, राष्ट्रपती हो... पण शेवटी वडील ते वडील... चुलते ते चुलते... मान तो मान.. हा सन्मान प्रत्येकांनी दिला पाहिजे. येथील जनता लेचीपेची नाही. ती शरद पवारांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहे. येत्या चार तारखेला जनतेचा कौल कुणाच्या बाजूनं आहे, हे कळेल," असं शर्मिला पवारांनी म्हटलं.
"...अन् पाच वर्षे मोकळंच बस्सा"
"मटण, बोकड जेवायला येण्याचं आमिष दाखवलं जाईल. पण, खावा कुणाचंही मटण दाबा फक्त, तुतारीचं बटण. नाहीतर एक वाटी रस्सा आणि पाच वर्षे मोकळंच बस्सा," असं शर्मिला पवार म्हणाल्या.
"सुळेंना पुन्हा संसदेत पाठवायचंय"
"शरद पवारांची ( Sharad Pawar ) पुण्याई सुप्रिया सुळेंच्या पाठीशी आहे. पण, कधीही सुळेंनी पवार नावाचा वापर आपल्या राजकीय कामासाठी केला नाही. निवडून द्यायचं की नाही द्यायचं हा जनतेचा अधिकार आहे. आज मुखात श्री राम म्हणतो. घराघरात रामायण आणि महाभारत सुरू आहे. मात्र, आपल्या लेकीला पुन्हा एकदा संधी द्यावी. सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आहे," असं शर्मिला पवारांनी म्हटलं.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.