Shrirang Barne Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : मावळ मतदारसंघावर राष्ट्रवादी अन् भाजपचा दावा, श्रीरंग बारणे म्हणाले...

Uttam Kute

पिंपरी : 29 फेब्रुवारी 2024 | मावळ लोकसभा ( Maval Lok Sabha Election 2024 ) लढविण्याच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ( अजित पवार गट ) दावा कायम आहे. अशातच मावळमधून मीच लढणार असल्याचा पुनरूच्चार शिवसेनेचे खासदर श्रीरंग बारणे ( Shrirang Barne ) यांनी बुधवारी ( 28 फेब्रुवारी ) केला. तसेच, गाफील न राहता उद्याच निवडणूक असल्याचं समजून तयारी लागा, असे आदेशही बारणेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडीत बुधवारी पक्षाचा पदाधिकारी मेळावा पार पडला. तेव्हा लोणावळा शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) माजी उपशहरप्रमुख संजय भोईर आणि शहर सहसंघटिका मनिषा भांगरे पिंपरी-चिंचवडमधील माजी उपजिल्हाप्रमुख स्वरुपा खापेकर, व्यापारी असोसिएशनचे कमलेश मुथा यांनी श्रीरंग बारणेंच्या ( Shrirang Barne ) उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"प्रवेश दिलेल्या कोणावरही अन्याय होणार नाही. त्यांचा सन्मान राखला जाईल. मी केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवा. आगामी निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पाठिंब्यावर लढणार आणि जिंकणार," असा दावा श्रीरंग बारणेंनी केला आहे.

दरम्यान, "भोईर आणि भांगरे यांच्या जाण्यानं पक्षाला काहीच फरक पडणार नाही," अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा माजी प्रमुख मच्छिंद्र खराडे आणि पिंपरी-चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे यांनी 'सरकारनामा'ला दिली. "सक्रिय नसल्यानं स्वरूपा खापेकर यांना पदावरून दूर केलं होतं. त्यामुळे पक्ष सोडल्यानं काहाही फटका बसणार नाही," असंही अनिता तुरारेंनी सांगितलं.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT