Pune News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Pune Municipal Corporation : राज्य सरकारने तब्बल 200 कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेला दिला असून या माध्यमातून शहरातील नाले आणि सीमा भिंती उभारण्यात येणार आहेत.
Devendra Fadnavis Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama

Pune News : पुणे शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी राज्य सरकार सरसावले आहे. शहरातील नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने तब्बल 200 कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेला दिला आहे. केवळ मतदारांना खूश करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. (Marathi News )

पुणे (Pune) शहरातील आंबिल ओढा परिसराला काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. अनेक सीमा भिंती पडल्या होत्या. मात्र या ठिकाणी खर्च करण्यात महापालिकेला अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत राज्य सरकारने हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय या संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis Ajit Pawar, Eknath Shinde
Chief Ministers Secretariat : मोठी बातमी! मुख्यमंत्री सचिवालयाकडून तक्रार, जनतेच्या निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदेंची बनावट सही

नाला परिसरातील नागरिकांमध्ये पावसाच्या काळात चिंतेचे वातावरण होते. म्हणून या कामासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती. मोहोळ यांनी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत 200 कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण सीमा भिंती बांधल्या जाणार आहेत.

विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना मोहोळ म्हणाले, 'कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने 2019 मध्ये आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली. त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती. त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला आहे.'

(Edited By-Ganesh Thombare)

Devendra Fadnavis Ajit Pawar, Eknath Shinde
Dilip Mohite Patil: आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा अन् दिलीप मोहितेंची उघड नाराजी; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com