Dilip Mohite Patil: आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा अन् दिलीप मोहितेंची उघड नाराजी; म्हणाले...

Shirur Lok Sabha Constituency : 'ज्यांनी मला तुरुंगात डांबण्यापर्यंत,मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतल्या,प्रयत्न केले. त्यांच्याबरोबर काम करायचं...'
Dilip Mohite Patil- Shivajirao Aadhalrao Patil
Dilip Mohite Patil- Shivajirao Aadhalrao Patil Sarkarnama

Shirur Loksabha Political News : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग -आऊटगोईंगला उधाण आले आहे.इच्छुकांनी आपलं तिकीटासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.याचवेळी पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या उमेदवारीसाठीही रोज नवनवीन दावे प्रतिदावे केले जात आहेत.गेल्या काही दिवसांपासून शिरुरचे माजी खासदार व शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरु लागली असतानाच आता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

शिरूरच्या उमेदवारीसाठी शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत जोरदार खलबतं सुरु आहे. उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता दिवसागणिक वाढतच चालली आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आणि नेते दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या उमेदवारीवर थेट भाष्य केले आहे.

Dilip Mohite Patil- Shivajirao Aadhalrao Patil
Raju Shetti Meet Mahadevrao Mahadik : महादेवराव महाडिक अन् राजू शेट्टींच्या भेटीनं चर्चांना उधाण; काय म्हणाले?

ते म्हणाले, शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तर त्यांचं स्वागत करायचं की नाही हा जर-तरचा भाग आहे.पण मी जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ त्यांच्याविरोधात संघर्ष केला आहे.त्यामुळे ते जर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर पक्ष त्यांचं स्वागत करेन. पण असलं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन अशी भूमिका मोहिते पाटलांनी स्पष्ट केली आहे.

आमदार दिलीप मोहिते नेमकं काय म्हणाले..?

राजकारण हे नेहमीच तत्वांकरिता व्हायला व्हावं.आयाराम गयारामांचं राजकारण झालं तर राजकारणाला काही अर्थ उरणार नाही. तसं राजकारण मला करायचं नाही.त्यामुळे पक्ष त्यांचं स्वागत करणार असेल तर मी त्यावर काही बोलणार नाही.शेवटी पक्ष आणि पक्षप्रमुख त्यांच्याबाबत निर्णय घेतील.पण मी असं राजकारण करण्यापेक्षा घरी बसेन. कारण माझ्या वैयक्तिक जीवनात काय निर्णय घ्यायचा, तो पूर्णपणे माझा अधिकार आहे असेही आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिलीप मोहिते पाटलांनी शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळरावांवर टीकेची झोड उठवली आहे.ते म्हणाले, मी गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्याशी भांडत आलो आहे. त्यांनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याबरोबर राजकारण केलं आहे.ते मी आयुष्यभर विसरू शकणार आहे.कारण ज्यांनी मला तुरुंगात डांबण्यापर्यंत,मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतल्या,प्रयत्न केले. त्यांच्याबरोबर काम करायचं किंवा नाही करायचं ते मी ठरवणार आहे. तो सर्वस्वी माझा निर्णय असेल.मी माझ्या लोकांना विचारून ठरवेन असेही ते म्हणाले.

Dilip Mohite Patil- Shivajirao Aadhalrao Patil
Chief Ministers Secretariat : मोठी बातमी! मुख्यमंत्री सचिवालयाकडून तक्रार, जनतेच्या निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदेंची बनावट सही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com