Pune News, 13 May : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ( Maval Lok Sabha Constituency ) गेल्या दहा वर्षात अनेक कामे केली. या मतदारसंघातील मतदारांचा आपल्यावर विश्वास असून या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रीक करण्याचा निर्धार महायुतीचे ( mahayuti ) उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे ( ठाकरे गट ) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे हे बारणे यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहेत.
या मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ 36.54 टक्के मतदान झाले आहे. यामुळे हॅट्ट्रीक हॅट्रीक मारण्याचे बारणे ( Shrirang Barne ) यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण होणार की मावळातून नवीन शिलेदार दिल्लीला जाणार, अशी चर्चा आता मतदार संघात सुरू झाली आहे. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या पाठीमागे उभे राहणे पसंत केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) महायुतीच्या माध्यमातून बारणे यांना तिकीट देण्यात आले. त्यांच्या विरोधात संजोग वाघेरे ( Sanjog waghere ) यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारणे यांनी थेरगावच्या संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या मतदान केंद्रावर परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजीत, सून स्नेहा यांच्यासह त्यांनी मतदान केले.
मतदानानंतर बारणे म्हणाले, "देशहितासाठी, उज्वल भवितव्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी नागरिक उस्फूर्तपणे मतदान करीत आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. 2019 मध्ये आपल्याला 2 लाख 31 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी ते रेकॉर्ड मोडून आपण नवीन विक्रम प्रस्थापित करू."
"मागील निवडणुकीचा विजयाचा रेकॉर्ड मोडून मताधिक्याचे नवे रेकॉर्ड होईल," असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे. तरी आतापर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघात झालेली मतदानाची टक्केवारी पाहता बारणे यांची 'हॅट्ट्रीक' होणार की याचा धक्का महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांना बसणार याची चर्चा सुरू झाली आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.