Hasan Mushrif, Supriya Sule sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : मुश्रीफांचे हेलिकॉप्टर; सुळे म्हणतात, 'बडे लोग, बडी बाते...'

Supriya Sule बारामती लोकसभा मतदार संघातील पिंपरी चिंचवड मधील ताथवडे भागात सुप्रिया सुळे आज प्रचारासाठी आल्या होत्या. या वेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतले.

Sudesh Mitkar

Pune News : मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरने आणू, असे जाहीर सभेत वक्तव्य केलं. हे म्हणजे "बडे लोग, बडी बाते" असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा समचार घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे भागात सुप्रिया सुळे आज प्रचारासाठी आल्या होत्या. या वेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतले. त्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मैदानात उतरले आहेत. त्यांनी इंदापुरात येऊन सुप्रिया सुळेंचे प्रचार प्रमुख प्रवीण माने यांची भेट घेतली. मात्र, ही भेट शरद पवार यांना संपवण्याच्या षडयंत्राचा भाग असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार या षडयंत्राचा भाग आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, यावर मात्र थेट न बोलता भाजपचे हे कारस्थान असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. चंद्रकांत पाटील हे शरद पवार Sharad Pawar यांना संपवायचे हे बारामतीत येऊन बोलले, पवार यांना हे संपवण्याचे कारस्थान असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हसन मुश्रीफ यांचे विधान म्हणजे बडे लोक बडी बाते मोठ्याच लोकांना हेलिकॉप्टर सूचतं ते धनवान आहेत. मोठी लोकं आहेत. अनेक नेते वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर वापरतात. अनेक पक्षदेखील हेलिकॉप्टर वापरतात. पण, एखाद्या पक्षाला मतदार फेऱ्या करायला जर हेलिकॉप्टर परवडत असेल.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारते आणि विनंती करते की याची चौकशी झाली पाहिजे. या नेत्याची इन्कम टॅक्स ई डी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी करेन. एवढे पैसे या लोकाकडे आले कुठून हे चिंताजनक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांची चौकशी करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT