Eknath Shinde-Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Maval Loksabha : मावळात शिवसेना VS शिवसेना; बारणेंची हॅटट्रिक होणार की स्वप्न भंगणार?

Shivsena News : श्रीरंग बारणेंनी स्वतःच केली उमेदवारी घोषणा; ठाकरेंचा उमेदवार आठवडाभरात जाहीर होणार

Uttam Kute

Maval Loksabha News : शिवसेनेचे (शिंदे गट) मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून आपले नाव अगोदरच जाहीर करून टाकले आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे शिवसेना लढणार असून त्यांचा उमेदवार आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातून ही लढत शिवसेनेच्या दोन्ही गटांतच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. (Thackeray Sena vs Shinde Sena will fight in Maval Lok Sabha Constituency)

दरम्यान, घाटाखाली आणि घाटावर असलेल्या मावळचे आतापर्यंतचे तीनही खासदार (त्यात प्रथम शिवसेनेचे गजानन बाबर व नंतर बारणे आतापर्यंत दोन टर्म) हे घाटावरचे आणि शिवसेनेचेच झालेले आहेत. पुन्हा 2024 मध्ये चौथ्यांदाही तो घाटावरचाच राहील, अशीच दाट शक्यता आहे. श्रीरंग बारणे हे पिंपरी-चिंचवडकर आहेत. तर, त्यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेना उमेदवार हाही घाटावरचा असेल, असे या पक्षाचे जिल्हाप्रमुख (मावळ) आणि पिंपरीचे माजी आमदार ॲड गौतम चाबूकस्वार यांनी आज ‘सरकारनामा’ला सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईत वांद्रे (पूर्व) येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या तयारीची बैठक झाली. त्यानंतर त्या बैठकीला उपस्थित असलेले ॲड चाबूकस्वार यांनी ही माहिती दिली.

मावळ लोकसभा ठाकरे सेना लढणार

मावळ लोकसभा जिंकण्याचा निर्धार मातोश्रीवरील बैठकीत करण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनीही सांगितले. तेही या बैठकीला उपस्थित होते. आघाडीत मावळची जागा शंभर टक्के ठाकरे शिवसेनाच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील तिघे इच्छूक असून त्यातील एकाचे नाव ठाकरे निश्चित करतील, असेही ते म्हणाले.

मावळात लोकसभेला बारणेंची उमेदवारी युतीकडून जवळपास नक्की आहे. ती त्यांनी स्वतःच जाहीर करून टाकली आहे. आता, फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे तेथे शिवसेनेचे दोन्ही गट भिडणार, हे जवळपास नक्की झाले आहे.

बारणे रेकॉर्ड करणार?

मावळ विधानसभेला कुठलाच पक्ष आणि व्यक्तीला आमदारकीची हॅटट्रिक आतापर्यंत करता आलेली नाही. लोकसभेला ही संधी बारणेंना मावळात यावेळी चालून आलेली आहे. त्यांनी 2024 मध्ये हॅटट्रीक केली, तर तो रेकॉर्ड होईल. तो होऊ न देण्याचा चंग ठाकरे सेनेना बांधला आहे. त्यासाठी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या पुढाकारातून मातोश्रीवर मावळ मतदारसंघाच्या तयारीची ही बैठक झाली. या बैठकीला मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हजर होते. जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्याचा विश्वास सर्वांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT