Sharad Pawar, Uddhav Tackery, Nana Patole Sarkarnama
पुणे

MVA News : महाविकास आघाडीची पुण्यात डोकेदुखी वाढणार, हडपसरसह 2 जागांवर 'या' समाजाने दावा ठोकला

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुका नोव्हेंबर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नसला तरी आजी-माजी आमदारांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचदरम्यान, आता महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) पुण्यात डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

मुस्लिम समाजाला पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हडपसर मतदारसंघावरती मुस्लिम समाजाकडून दावाही सांगण्यात आला आहे. यामुळे आता पुण्यात महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

महाविकास आघाडीने नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेत दिला नाही म्हणून व तसेच नुकताच विधान परिषदचे दोन जागा रिक्त झाल्याने तेथेही मुस्लिमांना न्याय दिला नाही म्हणून राज्यात प्रचंड प्रमाणात मुस्लिमांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापुढे महाविकास आघाडी कडून मुस्लिम (Muslim) समाजावर अन्याय होऊ व योग्य ते मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे.

पुणे शहर व जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघापैकी आगामी विधानसभा निवडणुकीत किमान दोन मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीने दिली पाहिजे अशी मागणी मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने करण्यात आली. त्याकरिता मुस्लिम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळ लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटून त्यांना विनंती करण्याचा ठराव ही बैठकीत मांडण्यात आला.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावी अशी मागणी महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांकडून सातत्याने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोंढवा येथे पुणे शहरातील आजी-माजी मुस्लिम नगरसेवक, सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, मुस्लिम धर्मगुरू, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांची संयुक्त बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाला पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हडपसर मतदारसंघावरती दावाही सांगण्यात आला.

तसेच या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व संमतीने पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते ॲड. अय्युब शेख यांना हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी देण्यात यावी असा ठराव करण्यात आला.

या ठरावाच्या प्रती या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना पाठवण्यात येणार असून राजकीय पक्षांकडून अय्युब शेख यांना उमेदवारी मिळावी अशी मुस्लिम समाजाची अपेक्षा आहे. दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षांनी विचार केला नाही, तरी मुस्लिम समाज दलित समाज व ख्रिश्चन यांची वैयक्तिक संबंध असलेले सर्व समाज बांधव यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवून विजय प्राप्त करू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT