Malegaon Sugar Factory .jpg Sarkarnama
पुणे

Malegaon Sugar Factory Election : 'छत्रपती' नंतर 'माळेगाव' कारखान्याच्या 'गुलालासाठी राजकीय धुरळा उडणार; निवडणूक कार्यक्रम ठरला

Baramati Political News : माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मार्चमध्येच लागणार होती. मात्र, अंतिम मतदारयादीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीचा योग्य तो निर्णय होईपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे, असा आदेश सहकार विभागानं 9 मार्चला काढला होता.

Deepak Kulkarni

Malegaon News : विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच आता बाजार समित्यांसह साखर कारखान्यांच्या निवडणुकांनीही वेग पकडला आहे. यातच आता 'छत्रपती' कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sugar Factory Election) पंचवार्षिक निवडणुकीचेही बिगुल अखेर वाजले आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 21 मेपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. तर निवडणुकीचे मतदान 22 जून रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे छत्रपती कारखान्यापाठोपाठ आता 'माळेगाव'च्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

बारामती तालुक्यातील (Baramati) माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मार्चमध्येच लागणार होती. मात्र, अंतिम मतदारयादीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीचा योग्य तो निर्णय होईपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे, असा आदेश सहकार विभागानं 9 मार्चला काढला होता.

दरम्यानच्या कालावधीत तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी तयार केलेल्या निवडणूक वेळापत्रक कार्यक्रमालाही शासनस्तरावर मंजुरी मिळाली नव्हती. परिणामी माळेगाव कारखान्याची निवडणूक आता दिवाळीपर्यंत पुढे जाते की काय, अशी कारखाना कार्यक्षेत्रात शंका उपस्थित होत होती.

दरम्यान, उच्च न्यायालयातील तक्रारीही निकाली निघाल्या आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी वैभव नावडकर यांची 'माळेगाव'च्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली व हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती केली. त्यामुळे पुन्हा निवडणुकीचे संकेत मिळाले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. 15) अशोक गाडे व यशवंत माने यांनी 'माळेगाव' चे निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.

प्रचाराला आठच दिवस

माळेगाव कारखान्यामध्ये 'छत्रपती' पॅटर्न वापरला जाणारा की दुरंगी अथवा तिरंगी लढत होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. मतदान कार्यक्रमात माघार घेण्यासाठी तब्बल 15 दिवस दिले असून, प्रचारासाठी मात्र आठच दिवस मिळणार असल्याने इच्छुकांची तारांबळ उडणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे- 21 ते 27 मे

उमेदवार यादी प्रसिद्धी- 21 ते 27 मे

अर्ज छाननी- 28 मे

वैध उमेदवार यादी प्रसिद्धी - 29 मे

■ उमेदवारी अर्ज माघार

मुदत

29 मे ते 12 जून

अंतिम यादी व चिन्हवाटप 13 जून

मतदान 22 जून

मतमोजणी 24 जून

निवडून द्यायचे प्रतिनिधी- एकूण 21

■ सर्वसाधारण गट- 15- माळेगाव (3), सांगवी (3), पणदरे (3), खांडज (3), नीरा वागज (2), बारामती (2). ब वर्ग प्रतिनिधी- 1. अनुसूचित जाती / जमाती 1. महिला 2. इतर मागासवर्ग- 1. भटक्या विमुक्त जाती जमाती 1.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT