Chhagan Bhujbal, Manoj Jarange  Sarkarnama
पुणे

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : विदूषक कोण, हेच आता दिसून आले..! भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीला ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळांनी यास जोरदार विरोध केला आहे. यातून मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे आणि भुजबळांमध्ये वारंवार शाब्दिक चकमक होत आहेत. परिणामी राज्यात मराठाविरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले आहे. यातच विदूषक कोण यावरून भुजबळ-जरांगे भिडले आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करून भुजबळ राज्यात सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांना अशी भूमिका घेणे शोभत नाही, असा टोला लगावत जरांगेंनी ते मंत्री कमी आणि विदूषक जास्त वाटतात, अशी जोरदार टीका केली होती. याला भुजबळांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भुजबळ म्हणाले, 'ते मला विदूषक म्हणत असतात. एकीकडे हल्ले करायचे आणि त्यांच्यावर कारवाई न करण्याची मागणी करायची. बीडमध्ये सलगपणे जाळपोळ करण्यात आली. यात भुजबळांच्या जवळील व्यक्तीच्या हॉटेलचा समावेश होता. यावर जरांगे प्रथम म्हणाले, की भुजबळांनी बीडमधील पाहुण्यांचे हॉटेल जाळले. नंतर म्हणाले शासकीय अधिकाऱ्यांनीच जाळपोळ केली, असे ते काहीही बोलत असतात.'

अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीत जरांगे पाटलांनी केलेल्या विधानांचीही भुजबळांनी चिरफाड केली. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगेंनी अजब विधान केले. अंतरवालीत पोलिसच एकमेकांशी भिडले. त्यांनीच एकमेकांना मारले, असे जरांगे म्हणाले होते. हा विदुषकपणा नाही तर काय आहे. दुसऱ्यांची लायकी काढणारे जरांगे सतत आपली विधाने बदलतात, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT