Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : आरक्षणासाठी राज्यात झुंडशाही; भुजबळांचा जरांगे पाटलांवर घणाघात

Maratha Kunabi Reservation : कुणबी पुराव्यांचा शोध पूर्ण, आता शिंदे समिती बरखास्त करा
Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Chhagan Bhujbal, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : ओबीसी आरक्षणात समावेश करून घेण्यासाठी सध्या अनेक बोगस कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. पूर्वी टाकाने लिहिलेल्या मराठा या जातीच्या जागी आता पेनाने कुणबी असे लिहिले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्याला माझा विरोध नाही. मात्र, आरक्षणाच्या नावाखाली राज्यात झुंडशाही सुरू आहे, त्याला विरोध आहे, असे म्हणत ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला.

मराठवाड्यासह राज्यात कुणबी नोंदी तपासण्याचे काम शिंदे समितीच्या माध्यमातून सुरू आहे. मराठवाड्यात निजामशाही काळातील कुणबी नोंदी मिळू शकतात. आता इतर जिल्ह्यांतही कुणबी नोंदी तपासण्याची कामे सुरू आहेत. मात्र मूळ कुणबी प्रमाणपत्र असलेल्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी भुजबळांनी केली आहे. आता जुन्या टाकाने केलेल्या नोंदींमध्ये खाडाखोड करून खोटी प्रमाणपत्रं देण्याची कामे सुरू असल्याचा आरोप भुजबळांनी केला.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Chhagan Bhujbal : जिथं पोलिसांवरच हल्ले होतात, तिथं माझं काय ? भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

जरांगेंची मागणी चुकीची

राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची मागणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मात्र, त्यांची ही मागणीच चुकीची असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. ओबसीत सुरुवातीला अडीचशे जाती होत्या. त्यानंतर कायद्याने मान्यता मिळाल्यानंतर ती संख्या साडेतीनशेहून अधिक झाल्या आहेत. जे कुणबी आहेत, त्यांच्या ओबीसीत समावेशाला हरकत नाही. मात्र, सरसकट मराठ्यांना कसे काय ओबीसीत स्थान दिले जाईल ? कायद्यानेही यास मान्यता मिळणार नाही, असे भुजबळ म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंतरवाली सराटीत झालेल्या पोलिसांवरील हल्ल्याबाबत छगन भुजबळ म्हणाले, राज्यात आरक्षणाच्या माध्यमातून झुंडशाही सुरू आहे. पोलिसांचे मनोबल वाढेल यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, पण येथे पोलिसांवरच हल्ले सुरू आहेत, झुंडशाहीच्या माध्यमातून जाळपोळ, दगडफेक करण्याची कामे सुरू आहेत. उलट माझ्यावरच जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत आहेत. मी कुठेही दगडफेक, जाळपोळ केली नाही, असेही भुजबळांनी खडसावून सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Sanjay Raut : पिंपरीत पुन्हा शिवसेनेचा आमदार करण्याचे शिवधनुष्य राऊतांना पेलणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com