Maval Lok Sabha Seat Sarkarnama
पुणे

Maval Lok Sabha Seat : खासदार बारणेंचा पाय आणखी खोलात, राष्ट्रवादीनंतर आता भाजपचाही मावळवर दावा!

Uttam Kute

Pimpri Chinchwad News : आगामी लोकसभेसाठी मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांच्याच पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही मावळची जागा पक्षाने लढवण्याची मागणी केली. त्यामुळे आधीच बारणेंचे वाढलेले टेन्शन आता भाजपनेही या जागेवर आक्रमकपणे दावा ठोकून आणखी वाढवले आहे. (Maval Lok Sabha Seat News)

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा खूप जास्त असल्याने ही जागा पक्षाकडे घेऊन लढविण्याची मागणी या मतदारसंघाच्या कोअर कमिटीच्या लोणावळा येथील बैठकीत आज (ता.२३) आक्रमकपणे करण्यात आली. तसेच तेथे आयात उमेदवार न देता तो पक्षाचाच असावा, असा आग्रह धरण्यात आला. पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपची किती आणि कशी ताकद जास्त आहे, हे तेथे पक्षाचे आमदार आणि नगरसेवकांच्या संख्या सांगत सप्रमाण दाखवून दिले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान,राष्ट्रवादीनंतर भाजपनेही मावळवर दावा ठोकल्याने बारणेंचे वाढलेले टेन्शन कायम राहिले आहे. मावळचा तिढा हा शिरुरसारखा झाला आहे. तेथे उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याची चुरस आणि उत्कंठा आणखी वाढली आहे. अशीच गत युतीची शिरुरलाही झालेली आहे. तेथे आघाडीचा उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे) नक्की झाला असून युतीत ही जागा शिवसेना की राष्ट्रवादी कोणी लढवायची यावरून स्पर्धा सुरु आहे. मावळातही आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार जवळपास नक्की झाला असून, ते फिरायलाही लागले आहे.

शिवसेनेपेक्षा (Shiv Sena) भाजपची ताकद जास्त असूनही मावळ लोकसभा पक्ष का लढत नाही? अशी सुप्त नाराजीची चर्चा पक्षात सुरु असल्याची बातमी सरकारनामाने मावळवरून 'महायुतीमध्ये रस्सीखेच; शेळकेनंतर अजित गव्हाणे सरसावले, बारणेंचे टेन्शन वाढले..' या हेडिंगने कालच (ता.२२) दिली होती. या सुप्त चर्चेने काही तासांतच मूळ धरले आणि ती आज आक्रमकपणे व्यक्तही झाली. मावळ (Maval) पक्षाकडे घेण्याची मागणी भाजपच्या मावळ कोअर कमिटीने केली. त्यातून सरकारनामाची बातमी खरी ठरली. मावळ लढविण्याची मागणी वरिष्ठांकडेही केली असल्याचे भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रेय गुंड यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT