Pune News : पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतर करून त्याला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावं अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राजकीय तसेच सामाजिक स्तरातून विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत.
थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याला आपला विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाला सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव असं कार्य केलेल्या व्यक्तीचे नाव दिलं जावं अशी मागणी केली आहे. तसेच भाजपा कडून पेशव्यांचे नाव देण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा पुण्यात पेशवाई आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.
यानंतर आता इतिहास अभ्यासकांकडून देखील याबाबत प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. कोकाटे म्हणाले, आपण राहतो त्या पुणे शहराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. आदिलशहाने पुणे शहर बेचिराख केले होते. त्याने पुण्याच्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरून पुन्हा येथे मानवी वस्ती होणार नाही अशी घोषणा त्याने केली होती.
मात्र, त्यानंतर राजमाता जिजाऊ या शिवरायांना घेऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सोन्याचा नांगर फिरवत हे शहर पुन्हा वसवण्याचे काम केले. परागंदा झालेल्या प्रजेच्या मनात त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे बेचिराक झालेले पुणे नव्याने वसवण्याची काम राजमाता जिजाऊ यांनी केले आहे.
आजघडीला पुण्याचा जो काही कायापालट झाला आहे, त्या पाठीमागे फक्त राजमाता जिजाऊ आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला (Pune Railway Station) राजमाता जिजाऊ यांचेच नाव देणे संयुक्तीक ठरेल असं कोकाटे म्हणाले.
कोकाटे पुढे म्हणाले, मेधा कुलकर्णी यांनी केलेली मागणी अत्यंत निराधार आहे. कारण राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती,पुणे शहर वसवले नसतं तर पेशवे वगैरे शौर्य गाजवू शकले असते का? पेशव्यांसारखे सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मुळे तयार झाले आहेत. आपण लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य चालू शकतो ही भावना राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केली आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव दिले पाहिजे.
निराधार आहे. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करतो. मेधा कुलकर्णी यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला असता तर ही मागणीच त्यांनी केली नसती. असं कोकाटे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.