
New Delhi News : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षासाठी आजचा दिवस आशेचा किरण जागवणारा ठरला आहे. चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. या निकालांत भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातसह पंजाबमधील पोटनिवडणुकीतील जागा जिंकत आम आदमी पक्षानं चांगली कामगिरी करत जोरदार कमबॅक केलं आहे.यानंतर आता अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) खास पोस्ट करत भाजपला डिवचलं आहे.
पंजाब,गुजरात,केरळ आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांतील विधानसभेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता.23) पार पडली. या पोटनिवडणुकींमध्ये गुजरातमधील दोनपैकी एका जागेवर भाजपनं आणि एका जागेवर आपनं विजय मिळवला आहे. केरळमधील जागेवर काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधील कालीगंजमध्ये तृणमूल काँग्रेसनं बाजी मारली आहे.
गुजरातमधील विसावदार व पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपचा उमेदवार विजयी झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपच्या उमेदवारांच्या विजयानंतर खास पोस्ट केली आहे. लुधियाना पश्चिम मतदारसंघातून सध्या राज्यसभेचे खासदार असलेल्या संजय अरोरा यांची विधानसभेत एन्ट्री झाल्यामुळे त्यांच्या जागी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
लुधियानातील आपचे उमेदवार संजीव अरोरा हे राज्यसभा खासदार आहेत. ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल. अरोरांच्या रिक्त होणाऱ्या जागेवरुन आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल राज्यसभेचे सदस्य होतील, अशा चर्चा आहेत. अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
गुजरातमधील विसावदार मतदारसंघात भाजपचा (BJP) धुव्वा उडवल्यानंतर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर पोस्ट करत कट्टर राजकीय विरोधक भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये गुजरातमधील जनता आता भाजपला कंटाळली असल्याचा टोला लगावला आहे.
विसावदर आणि लुधियाना येथे 'आप'चा शानदार विजय हा जनतेचा दुहेरी विश्वास आहे. दोन्ही ठिकाणी भाजप-काँग्रेस एकत्रितपणे 'आप'ला पराभूत करू इच्छित होते, परंतु जनतेने या दोन्ही पक्षांना पराभूत केले. पंजाब आमच्या कामावर खूश आहे आणि गुजरातला बदल हवा आहे.
गुजरातच्या विसावदर मतदारसंघात आणि पंजाबच्या लुधियाना पश्चिम मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या शानदार विजयाबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. गुजरात आणि पंजाबच्या जनतेचे अभिनंदन आणि आभार मानतानाच त्यांनी या दोन्ही ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत विजयाचे अंतर जवळजवळ दुप्पट झाले असल्याचं म्हटलं आहे.
गुजरातच्या विसावदर विधानसभेच्या जागेवर आपचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी 17 हजार 554 मतांनी भाजपच्या उमेदवार कीर्ती पटेल यांचा पराभव केला. विशेष म्हणजे तब्बल 18 वर्षांपासून भाजपला ही जागा जिंकता आली नाही. या जागेवर यापूर्वी आपचाच आमदार होता. मात्र, भाजपने त्याला फोडून आपल्या पक्षात घेतले. त्याने राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीत त्याला उमेदवारी न देता भाजपने कीर्ती पटेल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तरीसुद्धा भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.