Tanaji Sawant-Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Dr. Pawar suspension case : 'मुख्यमंत्रीसाहेब, अधिकाऱ्यांनाही नांगी मारणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या ‘खेकड्या’ला किती दिवस पाठीशी घालणार?'

Rohit Pawar on Tanaji Sawant : भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत काही खळबळजनक खुलासे केले आहेत. त्या पत्रामध्ये त्यांनी एका मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं करण्यास सांगितल्याचं नमूद केलं आहे.

Sudesh Mitkar

Pune, 26 May : महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ प्रकरणात आणि विभागांतर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे पालिकेत आरोग्य प्रमुख पदावर कार्यरत असणारे डॉ. भगवान पवार यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

भगवान पवार (Bhagwan Pawar) यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत काही खळबळजनक खुलासे केले आहेत. त्या पत्रामध्ये त्यांनी एका मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं करण्यास सांगितल्याचं नमूद केलं आहे. तसेच, इतर आरोग्यविषयक खरेदी प्रकरणातही दबाव आणला, असा गंभीर आरोप पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. या प्रकारांना नकार दिल्याने माझ्यावर आकसापोटी ही कारवाई करण्यात आला असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणावरून रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांगी मारण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटलं आहे. आमदार पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आरोग्य विभागात रुग्ण्वाहिका खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केली आहे. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहेत का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार आहात? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा सवालही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT