Nana Patole  Sarkarnama
पुणे

Nana Patole News : 'भटकती आत्मा' टीका काँग्रेसच्याही जिव्हारी; नाना पटोले मोदींना म्हणाले...

Sudesh Mitkar

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. याचवेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकेची झोड उठवली. या वेळी त्यांनी पवारांचा उल्लेख हा भटकती हुई आत्मा असा केला. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभेच्या प्रचार दौऱ्यावरती असताना पुण्यामध्ये नाना पटोले यांनी मंगळवारी मीडियाशी संवाद साधला. पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भटकती ही आत्मा हे स्वतःसाठी बोलले असतील त्यांनी जे काल सांगितलं आहे. ते सगळं विश्लेषण त्यांना स्वतःला लागू होते. मोदी हे स्वतःच अतृप्त आत्मा आहेत. त्यांनी कुठे खोक्याची सरकार आणलं तर कधी दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन सत्ताबदल केला आणि लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडली आहेत. कर्नाटक, मध्य प्रदेशची सरकार मोदींनी पाडली आहेत. ज्यांना प्रधानमंत्री होणं एकमेव महत्त्वाकांक्षा आहे. ज्यांचं मन शांत नाही अशी अतृप्त आत्मा देशांमध्ये एकमेव आहे. ती काल महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या रूपात आली होती, अशी टीका या वेळी नाना पटोले यांनी केली.

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (ता.29) काँग्रेसवरती सडकून टीका केली. त्यावर पटोले म्हणाले, पंतप्रधान हे एका राज्याचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान असतात . मात्र मोदी हे फक्त गुजरातचा विचार करत असतात. कांदा निर्यातीसाठी ते गुजरातला परवानगी देतात. राज्यातील उद्योगधंदे ते गुजरातला घेऊन जातात. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये जाऊनच प्रचार केला पाहिजे. पंतप्रधानांची विचार करण्याची क्षमता ही मर्यादित आहे. कालच्या सभेचा जेवढा बाऊ करण्यात आला होता, पण तसं झालं नाही. अनेक खुर्च्या या रिकाम्या होत्या. आज लोक मोदींना ऐकत नाहीत ते टीव्हीवरती दिसले की टीव्ही बंद करतात, असा टोलाही पटोले यांनी या वेळी लगावला.

काँग्रेसमधील अंतर्गत वादावरती नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, भाजपमध्ये उमेदवारीवरून किती मारामारी आहे. मीडिया मॅनेजमेंट आमच्याकडे कमी पडतं असं आम्ही मानतो. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. काँग्रेसचे सगळे नेते पुण्यामध्ये काम करतील जो कसबा निवडणुकीमध्ये जो रिझल्ट आम्हाला मिळाला, त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळेल. आमचा उमेदवार या ठिकाणी बहुमताने निवडून मोठ्या संख्येने लाखांच्यावर मताधिक्य आम्हाला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण आहे, असंही या वेळी पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा शाप लागतो असं वक्तव्य केलं होतं. त्यावर उत्तर देताना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण समाजात जन्माला आले म्हणून कोणालाही शाप द्यायचा अधिकार त्यांना नाही. आपण ब्राह्मणासारखं वागलं पाहिजे. त्यांची मानसिकता कशी आहे ती आपण गेल्या 2014 ते 2019मध्ये पाहिली आणि आता ते कसे वागतात ते आपल्याला माहिती आहे.

ज्या धवलसिंह मोहिते पाटलाला यांनीच खोटे आरोप लावून 302 चा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला होता. तसेच एक मोहिते पाटील दुसरीकडे गेले म्हणून धवलसिंग पाटलांना जवळ केलं. महाराष्ट्रामध्ये तोडाफोडीचा ब्लॅकमेलिंगचा जो धंदा आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी तो सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस आहे म्हणून दुसऱ्याला शाप देण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान होतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले, राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असं संजय राऊत म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंचे नाव घेत असतील तर ते अशी भूमिका का बदलतात त्यांनाच माहीत आहे. इंडिया आघाडी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखालील सरकार देशात येईल, असं या वेळी नाना पटोले म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. त्याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, भ्रष्टचार करणाऱ्यांवर काय बोलणार आहे. मोदींनी सांगितलं होतं, त्यांनी भ्रष्टाचार किती केला आहे. पण आता एका छोट्या भ्रष्टाचारीने मोठ्या भ्रष्टाचाराचे कौतुक केले आहे, असा चिमटाही या वेळी नाना पटोले यांनी काढला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT