BJP Manifesto 2024, Narendra Modi Sarkarnama
पुणे

Narendra Modi Rally In Pune : 70 वर्षांवरील व्यक्तींना मोफत उपचार! PM मोदींच्या भाषणातील 'हे' आहेत ठळक मुद्दे

Mahayuti Pune Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात महायुतीच्या मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ रेसकाेर्सच्या मैदानावर सभा झाली.

Deepak Kulkarni

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे. महाराष्ट्रात महायुतीने मिशन 45 पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. सोमवारी (ता.29)त्यांनी सोलापूर, कराड आणि आता पुण्यात सभा घेतली. त्यात आता मोदींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यात 70 वर्षांवरील व्यक्तींना मोफत उपचार केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुण्यात महायुतीच्या मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ रेसकाेर्सच्या मैदानावर सभा झाली. या सभेत मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा करतानाच काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. तसेच महाराष्ट्रात अनेक भटकते आत्मे आहेत. तसेच एका नेत्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी राज्यात अस्थिरतेचा खेळ सुरू ठेवल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर टीका (Sharad Pawar) केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

* 70 वर्षांवरील व्यक्तींना मोफत उपचार होणार

* काँग्रेस 60 वर्षांत मूलभूत सुविधाही देऊ शकला नाही.

* लवकरच देशात बुलेट ट्रेन सुरू करणार

* मनमोहन सिंग यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षांत मूलभूत सुविधांवर जेवढा खर्च केला तेवढा आम्ही एक वर्षात केला.

* केवळ दहा वर्षांत देशात युवकांचे सव्वा लाखापेक्षा जास्त स्टार्टअप

* भारत आज जगातला दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे.

* 2014 नंतर महागाई, भ्रष्टाचार नियंत्रणात आणला.

* भारताला सेमी कंडक्टर हब बनवणार

* सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध

* महाराष्ट्रात अनेक भटकते आत्मे

* एका नेत्याच्या महत्वाकांक्षेसाठी राज्यात अस्थिरतेचा खेळ सुरू

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT