Pune News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे सध्या वाहताना पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी 27 मार्चला तारखेला मतदान होणार आहे. या पाच जागांमधील तीन जागा भाजपच्या वाट्याला तर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. मात्र, अजित पवारांच्या वाट्याला येणाऱ्या या एक जागेसाठी तब्बल 100 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेच्या पाच सदस्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या जागा रिक्त झाल्या पाच जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीत गोपिचंद पडळकर, राजेश विटेकर, आमश्या पडवी, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे विधान परिषदेतील सदस्य विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर या पाच जणांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पाच जागा जागांवर भाजपकडून तीन तर शिंदे आणि अजित पवारांकडून प्रत्येकी 1 नेत्याची वर्णी आमदार पदावर लागणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी 17 मार्चला शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) या एका पदासाठी इच्छुकांची रांग असल्याच्या पाहायला मिळत आहे. तब्बल 100 जणांनी विनंती अर्ज करून आपल्याला आमदार करावं असं साकडं अजित पवारांकडे घातले आहे.
पुण्याचा विचार केल्यास पुण्यातून देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) हे विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. मागील वेळी देखील त्यांना संधी न मिळाल्याने त्यांनी राजीनामा अस्त्र उगारला होते. आता देखील ते आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत.
अजित पवारांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटेंनी देखील या जागेवर दावा केला आहे. चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना मला पुढं संधी दिली जाईल, असा शब्द अजितदादांनी दिला होता. हा शब्द अजितदादा या विधानपरिषद निवडणुकीत पाळतील अन मला उमेदवारी देतील, असे म्हणत काटेंनी या जागेवर दावा केलाय. त्यामुळे आता या 100 जणातून अजित पवार नेमका कोणाचा नंबर लावणार, हे पाहणं महत्त्वाचे आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.