Chandrakant Patil on Dhangekar : धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी; चंद्रकांत पाटील म्हणाले, "तर मी त्यांना पक्षात घेण्याविरोधात..."

Mahayuti Pune Politics : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे स्थानिक नेते या प्रवेशाबाबत उघड उघड नाराजी व्यक्त करत आहेत.
Eknath Shinde, Ravindra Dhangekar, Chandrakant Patil
Eknath Shinde, Ravindra Dhangekar, Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 12 Feb : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे स्थानिक नेते या प्रवेशाबाबत उघड उघड नाराजी व्यक्त करत आहेत.

अशातच भाजप आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, धंगेकर आणि आमचा फक्त पंगा नाही तर आम्ही एकमेकांच्या विरोधात तीन निवडणुका लढवल्या असून त्यातली एक हरलो तर दोनदा त्यांना हरवलं आहे.

Eknath Shinde, Ravindra Dhangekar, Chandrakant Patil
Santosh Deshmukh murder case: धक्कादायक, संतोष देशमुख हत्येतील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये?

राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट काळाच्या ओघांमध्ये बदलत असते याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत. राज्यामध्ये महायुतीचे तीन पक्षांचं आमचं सरकार आहे. जर भाजपच्या नेत्यांनी धंगेकरांना (Ravindra Dhangekar) पक्षात घेण्याच्या विचार केला असता तर मी त्या विरोधात भांडलो असतो.

मात्र महायुतीतील (Mahayuti) प्रत्येक पक्षाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे स्वातंत्र्य आहे. महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले तरी ते मर्ज झालेले नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) वाटलं असेल की पुण्यामध्ये त्यांचं काम वाढवायचा आहे. म्हणून त्यांनी धंगेकरांना घेतलं असेल. मात्र आता ते महायुतीच्या मित्र पक्षातील सदस्य झाले आहेत.

Eknath Shinde, Ravindra Dhangekar, Chandrakant Patil
Suresh Dhas On Ajay Munde News : अजय मुंडे लहान, त्याला काही माहित नाही; धनंजय मुंडेंनी बोलावं, मग उत्तर देईन!

त्यामुळे काही भाजपमधील लोक आपली भावना व्यक्त करत आहेत. मात्र तेवढं स्वतंत्र आम्ही पक्षातील लोकांना देतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जरी धंगेकरांबाबत भावना असल्या तरी ते आता आमच्या प्रमुख सहयोगी पक्षाचे नेते झाले असल्याने आमचा वाद न होऊन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पुढील काळामध्ये आम्ही समन्वयाने पुढे जाऊ, असंही ते यावेळी म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com