Pune Assembly Election-2024 Sarkarnama
पुणे

Maharashtra Assembly Survey : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच ‘दादा’; पण इंदापूरची जागा धोक्यात...

सर्वेनुसार जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, बारामती आणि मावळ या जागा राष्ट्रवादी कायम राखणार असल्याचे दाखविण्यात आलेले आहे.

सरकारनामा ब्यूरो

News Arena India Survey : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपला सर्वाधिक १२५ जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरेना इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. त्यात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारसंघात राष्ट्रवादी पुन्हा एकदा बाजी मारणार असल्याचे पुढे आले आहे. मात्र, इंदापूरची जागा राष्ट्रवादी गमावण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र जैसे थे परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. (NCP will win maximum number of seats in Pune district assembly elections)

पुणे (Pune) जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला मानला जातो. कारण शरद पवार यांचा गृहजिल्हा आहे. त्यामुळे पुण्यावर पवारांचा कायम वरचष्मा राहिलेला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात भाजपला (BJP) सर्वाधिक ९, तर राष्ट्रवादीला ८ जागा दाखविण्यात आलेल्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसच सवाधिक जागा जिंकणारा पक्ष असेल, असे न्यूज एरेना इंडिया या संस्थेच्या सर्व्हेमध्ये म्हटलेले आहे.

या सर्वेनुसार जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, बारामती आणि मावळ या जागा राष्ट्रवादी कायम राखणार असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ मात्र भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे इंदापुरात माजी मंत्री दत्तात्रेय भरणे हे धोक्यात आल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे मावळमध्ये भाजपला पुन्हा धक्का बसणार आहे. या ठिकाणी सुनील शेळके हे पुन्हा बाजी मारतील, असे सर्व्हेनुसार दिसते.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस सहा जिंकून प्रथमस्थानी राहणार आहे, तर भाजपला दौंड आणि इंदापूर या दोन जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पुन्हा दोन्ही जागा जिंकेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरीची राखीव जागा अण्णा बनसोडे यांच्या रुपाने परत मिळवेल, अशी शक्यता आहे.

पुणे शहरात कसबा, वडगाव शेरी भाजप खेचून आणेल, तर शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट हे मतदारसंघ गमावणार असल्याची शक्यता आहे. त्यानुसार शहरातील वडगाव शेरी, कोथरुड, खडकवासला, पर्वती आणि कसबा पेठ हे मतदारसंघ जिंकण्याचा अंदाज आहे, तर शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट हे दोन मतदारसंघ काँग्रेसला आणि हडपसर पुन्हा राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

News Arena India Survey : Pune - BJP : 9, INC : 4, NCP : 8

Junnar : NCP

Ambegaon : NCP

Khed Alandi : NCP

Shirur : NCP

Daund : BJP

Indapur : BJP

Baramati : NCP

Purandar : INC

Bhor : INC

Maval : NCP

Chinchwad : BJP

Pimpri (SC) : NCP

Bhosari : BJP

Vadgaon Sheri : BJP

Shivajinagar : INC

Kothrud : BJP

Khadakwasla : BJP

Parvati : BJP

Hadapsar : NCP

Pune Cantonment (SC) : INC

Kasba Peth : BJP

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT