Ganesh Sugar Factory Result : थोरात-कोल्हे पॅनेलची आठ जागांवर बाजी; विखेंचा पॅनेल पिछाडीवर

Ganesh Sakhar Karkhana Election Result: पहिला निकाल विखे पाटील यांच्या बाजूने लागला होता. मात्र, ऊस उत्पादक गटातून तीन उमेदवार विजयी झाल्याने थोरात-कोल्हे यांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती.
Ganesh Sugar Factory Result
Ganesh Sugar Factory ResultSarkarnamna
Published on
Updated on

नगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात-विवेक कोल्हे यांच्या पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. काराखान्याच्या १९ जागांपैकी ८ जागांवर थोरात आणि कोल्हे पॅनेलने विजय मिळवला आहे. त्यामुळे विखे पाटील यांना मतदारसंघातच पराभावाला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Ganesh Factory Election Results: Thorat-Kolhe Panel Wins Eight Seats; Vikhe's panel of behind)

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Sugar Factory Election) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांच्याविरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी एकत्रित पॅनेल उभा केला आहे. त्यात पहिला निकाल विखे पाटील यांच्या बाजूने लागला होता. मात्र, ऊस उत्पादक गटातून तीन उमेदवार विजयी झाल्याने थोरात-कोल्हे यांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. ती आघाडी वाढत जाऊन आता आठ जागांवर थोरात आणि कोल्हे पॅनेलने विजय मिळविला आहे.

Ganesh Sugar Factory Result
Ganesh Sugar Factory Result : विखे पाटलांना धक्का; ऊस उत्पादक गटात थोरात-कोल्हे गटाचे तीनही उमेदवार विजयी

नगर जिल्ह्यातील थोरात विरुद्ध विखे पाटील संघर्ष गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आला आहे. विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोरात आणि विवेक कोल्हे यांचे पॅनेलने विखे पाटील पॅनेलला जोरदार आव्हान दिले होते. ‘ब’ वर्गातील विखे गटाचे ज्ञानदेव बाजीराव चोळके हे १५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी कोल्हे गटाचे सुधाकर जाधव यांचा पराभव केला. चोळके यांना ४४ मते पडले असून जाधव यांना २९ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली आहेत.

Ganesh Sugar Factory Result
BJP's Mission Baramati : मिशन बारामतीसाठी भाजपचा संग्राम थोपटेंसाठी ‘ट्रॅप’; भोरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत शीतयुद्ध

गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे या देखील मैदानात उतरल्या होत्या. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे गटाच्या पॅनलच्या प्रचाराची धुरा संजीवनीच्या कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या खांद्यावर होती. पण शेवटच्या टप्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे या देखील प्रचारात उतरल्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com