Waghalwadi Gram Panchayat Election Sarkarnama
पुणे

बारामतीत धक्कादायक निकाल : राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षाचा तरुणाकडून दारुण पराभव

ग्रामविकास'च्या प्रतिक्षा पवार यांचा वचनपूर्तीच्या अनिता दडस यांनी एक मताने पराभव केला.

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : वाघळवाडी ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) मतदारांनी धक्कादायक निकाल नोंदवत विद्यमान सदस्य ॲड. हेमंत विलास गायकवाड या तरुणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ टाकली. सरपंचपदाच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बारामती (Baramati) तालुका उपाध्यक्ष (Vice President) तथा माजी सरपंच सतीश सकुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सात जागा मिळवत बहुमत पटकावले. दरम्यान, गणेश जाधव व जितेंद्र सकुंडे या उपसरपंचांवर मात्र मतदारांनी पुन्हा विश्वास टाकला आहे. (NCP's Baramati Taluka Vice President defeated by Tarun in Sarpanch election)

वाघळवाडीत सरपंचपदाच्या पाच उमेदवारांपैकी सतीश सकुंडे व हेमंत गायकवाड या दोघांतच चुरस होती. यामध्ये मतदारांनी हेमंत गायकवाड यांना १०४५ इतक्या मतांचे विजयी दान दिले, तर सतीश सकुंडे यांना ७७९ मतांवर समाधान मानावे लागले. पाचपैकी चार प्रभागात गायकवाड यांचा वरचष्मा राहिला. भाजपचा युवा चेहरा बबलू सकुंडे यांनी ४६४ इतकी लक्षवेधी मते घेतली. मात्र ॲड. अनंत सकुंडेंना ११९, तर ज्योतिराम जाधवांना अवघ्या ३४ मतांवरच समाधान मानावे लागले.

सदस्यपदाच्या लढतीत सतीश सकुंडे यांच्या अंबामाता वचनपूर्ती पॅनेलला तेरापैकी सात जागांवर विजय मिळाला. तर अजिंक्य सावंत, ॲड. गायकवाड, अविनाश सावंत, धोंडिराम जाधव, जितेंद्र सकुंडे, बबन अनपड, सूरज जाधव, गजानन सकुंडे आदींच्या नेतृत्वाखालील अंबामाता ग्रामविकास पॅनेलला सरपंचपदासह सदस्यांच्या पाच जागा मिळू शकल्या. मागील निवडणुकीत याच्या उलटी परिस्थिती होती.

पहिल्या प्रभागात युवा नेते तुषार सकुंडे, धनश्री जाधव, सुषमा सावंत यांनी सहज विजय मिळविला. दुसऱ्या प्रभागात प्रभाकर कांबळे यांनी वसंत लोखंडे व अक्षय लोखंडे चुलत्या-पुतण्याचा पराभव केला. यासोबत निशिगंधा सुजीत सावंतही विजयी झाल्या. तिसऱ्या प्रभागात सतीश सकुंडे याच्यापत्नी मनिषा सकुंडे यांचा विशाल दिलीप हंगीरे या युवकाने पराभव केला. तर उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांनी बाळकृष्ण भोसले यांचे आव्हान सहज परतवले. चौथ्या प्रभागात गणेश जाधव तब्बल चौथ्यांदा निवडून आले. त्यांच्यासोबत निर्मला दत्तात्रेय केंगार, आशा गणेश चव्हाण मोठ्या फरकाने विजयी झाल्या.

एक मताने विजय

प्रभाग पाचमध्ये 'ग्रामविकास'चे अनिल शिंदे व सोनाली दडस यांनी अनुक्रमे ३८ व ६ मतांनी विजय मिळविला. मात्र 'ग्रामविकास'च्या प्रतिक्षा पवार यांचा वचनपूर्तीच्या अनिता दडस यांनी एक मताने पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT