Gram Panchayat Result: आंबेगावात राष्ट्रवादी पुन्हा....२१ पैकी १७ ग्रामपंचायतींवर वळसे पाटलांचे वर्चस्व!

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोन, भाजप एक व महाविकास आघाडीने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.
Ambegaon : Gram Panchyat Election
Ambegaon : Gram Panchyat ElectionSarkarnama
Published on
Updated on

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीपैकी (Gram Panchyat) १७ ग्रामपंचायतींवर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) पक्षाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोन, भाजप एक व महाविकास आघाडीने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. (In Ambegaon taluka, NCP dominated 17 out of 21 Gram Panchayats)

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे मंगळवारी (ता. २० डिसेंबर) सकाळी मतमोजणी झाली. चिंचोडी-लांडेवाडी व भावडी गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. निघोटवाडी, पारगावतर्फे खेड, घोडेगाव व मेंगडेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनुक्रमे शिवाजीराव निघोट, सरपंच सचिन पानसरे, कैलास बुवा काळे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता काबीज केली आहे.

Ambegaon : Gram Panchyat Election
Gram panchayat result updates: परिचारक गटाच्या शिवानंद पाटलांनी गाव राखले; मंगळवेढ्यात समविचारीचा बोलबाला

चांडोली बुद्रुक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरपंचपद मिळविले आहे. पण ग्रामपंचायत सदस्यांची संख्या तेथे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाची अधिक आहे. कळंब ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या उषा सचिन कानडे सरपंच झाल्या आहेत, असे पॅनेलप्रमुख नितीन भालेराव यांनी सांगितले. भावडी येथे आढळराव पाटील समर्थक अशोक बाजारे, महेश नवले, बाळासाहेब काळे, रमेश काळे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम ठेवली आहे.

Ambegaon : Gram Panchyat Election
Gram panchayat election result : गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांना धक्का; मुलीचा विजय मात्र संपूर्ण पॅनेलचा धक्कादायक पराभव

भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात व तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांच्या नेतृत्वाखाली साल ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकलेल्या ग्रामपंचायती : घोडेगाव, आंबेदरा, अमोंडी, गंगापूर खुर्द, चांडोली बुद्रुक, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी, धामणी, भावडी,नारोडी, निघोटवाडी, रांजणी. बिनविरोध : नागापूर, डिंभे खुर्द, आहुपे, तळेघर, चिखली. बाळासाहेबांची शिवसेना : चिंचोडी-लांडेवाडी, भावडी, भाजप : साल. महाविकास आघाडी : कळंब.

Ambegaon : Gram Panchyat Election
मोठी बातमी : बालेकिल्ल्यातच फडणवीसांना झटका; दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीची सत्ता

दरम्यान शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब बेंडे, विष्णू हिंगे, देवदत्त निकम, विवेक वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, ॲड. प्रदीप वळसे पाटील आदी नेत्यांनी निवडणुकीचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगला कौल मिळाला आहे. दरम्यान, साल गावचे सरपंच प्रवीण साबळे यांनी दुपारी लांडेवाडी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन मी तुमच्या बरोबर आहे. विकास कामांना सहकार्य करा, अशी विनंती केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com