Cockroach Janata Party Goes Viral Sarkarnama
पुणे

Pune Police : पुणे पोलिसांचा 'कॉकरोच जनता पक्षा'ला सल्ला; "नियम ठाऊक नाहीत का? आंदोलनासाठी ही जागा नाही, संबंधित विभागाकडे जाऊन दाद मागा

NEET paper leak News : छत्रपती संभाजी महाराज उद्यानाबाहेर 3 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी स्पष्ट शब्दांत परवानगी नाकारली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : नीट पेपर घोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींच्या विरोधात पुण्यात आक्रमक पवित्र्यात असलेल्या 'कॉकरोच जनता पक्षा'च्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी कायदेशीर ब्रेक लावला आहे. 3 जुलै रोजी छत्रपती संभाजी महाराज उद्यानाबाहेर होणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी स्पष्ट शब्दांत परवानगी नाकारली आहे. मात्र, केवळ परवानगी नाकारून पोलीस थांबलेले नाहीत, तर त्यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलनाचे नियम सांगत एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.

...तर पर्यायी जागेचा वापर करा; पोलिसांचा थेट सल्ला

आंदोलनाबाबत डेक्कन पोलिसांनी कॉकरोच जनता पक्षचे आंदोलनकर्ते रमीझ सय्यद यांना बजावलेल्या अधिकृत नोटिसी बजावली आहे. या नोटीसीमध्ये म्हटले आहे की "आपण आपल्या मागण्यांसाठी योग्य त्या न्याय मार्गाचा अवलंब करून संबंधित विभागाकडे दाद मागावी. आपण नियोजलेले आंदोलनाचे ठिकाण संभाजी महाराज उद्यान परिसर हे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी आरक्षित नाही. सबब, आपण ज्या ठिकाणी नियमित आंदोलने होतात अशा प्रशासनाने ठरवून दिलेल्या पर्यायी जागेचा वापर करावा."

कायद्याचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशारा

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले आहे की, डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे आंदोलन करून आदेशाचा भंग केल्यास रमीझ सय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रचलित कायद्यान्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. ही नोटीस भविष्यात न्यायालयामध्ये पुरावा म्हणून देखील वापरली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिला आहे.

आंदोलक भूमिकेवर ठाम

पोलिसांनी थेट पर्यायी जागेवर जाण्याचा सल्ला दिला असला, तरी 'कॉकरोच जनता पक्ष' मात्र आपल्या मूळ आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या या सल्ल्यानंतर आणि नोटिसीनंतर पक्षाची एक तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत पोलीस प्रशासनाचा सल्ला ऐकायचा की आदेश डावलून रस्त्यावर उतरायचे, यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या सर्व घडामोडींमुळे उद्या ३ जुलै रोजी पुण्यातील डेक्कन परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT