Dheeraj Ghate  Sarkarnama
पुणे

Dheeraj Ghate News : पक्षासाठी धीरज घाटेंकडे पुण्याची जबाबदारी; कशी पेलणार आव्हाने ?

Pune City BJP News President : शहराध्यक्षपदाच्या रूपाने पक्षाने घाटेंकडे मोठी जबाबदारी देऊन त्यांच्यावर विश्‍वास दाखविला आहे. पण...

सरकारनामा ब्यूरो

Pune : भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे धीरज घाटे यांची आज नियुक्ती करण्यात आली. कसबा पोटनिवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरणे ही घाटे यांना संधी मिळण्याचे प्रमुख कारण मानलं जात आहे. शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रामुख्याने विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश बिडकर, मुरलीधर मोहोळ यांची नावे आघाडीवर होती.

मुळीक विद्यमान शहराध्यक्ष आहेत. त्यांनाच पुन्हा संधी मिळू शकेल, असे सांगण्यात येत येत होते. मात्र, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याने सारी समीकरणे बदलली आणि घाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बुधवारी(ता.१९) त्याची केवळ औपचारिक घोषणा करण्यात आली.

कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीतील उमेदवारीवरून राजकारण झाले. ब्राम्हण उमेदवार द्यावा यावरून राजकारण तापले. अनेक घडामोडीनंतर माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली.

भाजपाने खूप प्रयत्न केले. तरीही निवडणुकीत पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने ब्राम्हण मतदार नाराज झाल्याची चर्चा निकालानंतर सुरू झाली. त्यानंतर ब्राम्हण मतदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षाकडून करण्यात येतील, अशी चर्चा सुरू झाली. घाटे यांची नियुक्ती हा सामाजिक समतोल साधण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

धीरज घाटे(Dheeraj Ghate) हे संघाचे स्वयंसेवक आहेत.आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव आहे. भाजपाच्या पक्ष संघटनेतही गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. २०१७ च्या निवडणुकीत त्यांना पहिल्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली. लगेचच त्यांना महापालिकेत सभागृह नेतेपददेखील देण्यात आले. पण काही महिन्यांतच त्यांना हे पद सोडावे लागले.

शहराध्यक्षपदाच्या रूपाने पक्षाने त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देऊन त्यांच्यावर विश्‍वास दाखविला आहे. पक्षाने दाखविलेला विश्‍वास त्यांना येत्या काळात सिद्ध करावा लागणार आहे.पुणे महापालिकेची निवडणूक, पुणे लोकसभा व त्यानंतर शहरातल्या आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुका घाटे यांच्या नेतृत्वाखालीच लढाव्या लागणार आहेत.

भाजपा(BJP)ने खूप प्रयत्न केले. तरीही निवडणुकीत पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने ब्राम्हण मतदार नाराज झाल्याची चर्चा निकालानंतर सुरू झाली. त्यानंतर ब्राम्हण मतदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षाकडून करण्यात येतील, अशी चर्चा सुरू झाली. घाटे यांची नियुक्ती हा सामाजिक समतोल साधण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

संघटना बांधणी करताना नव्या-जुण्या कार्यकर्त्यांचा मेळ घालावा लागणार आहे. गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेत भाजपा सत्तेत होती. या काळात झालेल्या कामांचा लेखाजोखा विरोधक मांडत आहेत. त्यालाही योग्य उत्तर देण्याची तयारी घाटे यांना करावी लागणार आहे.

राज्य सरकारने गेल्या वर्षभरात केलेले काम तसेच केंद्र सरकारच्या कामाची पोचपावती मिळविण्यासाठी योग्य नियोजन करणे घाटे यांच्या फायद्याचे ठरू शकते. मात्र, या साऱ्याची मांडणी ते पुणेकरांसमोर कशी करतात त्यावर बरेच अवलंबून आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT