Yugendra Pawar Sarkarnama
पुणे

Yugendra Pawar : भावी नव्हे; तर फिक्स आमदार : युगेंद्र पवारांचे बारामतीत बॅनर

Baramati Assembly Election : बारामतीत आज युगेंद्र पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर ‘भावी नव्हे; तर फिक्स आमदार’ असे लिहिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांचे नाव निश्चित झाले आहे का, अशी चर्चा आता बारामतीत आहे.

Vijaykumar Dudhale

Baramati, 25 August : बारामती विधानसभा मतदारसंघातील आगामी लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार का, याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे नाव बारामतीसाठी चर्चेत आहे. आता तर भावी नव्हे तर फिक्स आमदार असे बॅनर बारामतीत लागले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता होती. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना उतरवून अजित पवार यांनी बारामतीची लढत सर्वाधिक हेवीवेट केली होती. त्या लढतीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास यांनीही शरद पवार यांना साथ दिली होती.

श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी आजोबांना साथ देताना काकांवर हल्लाबोल चालवला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीची सातत्याने चर्चा होतान दिसत आहे.

बारामतीत आज युगेंद्र पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर ‘भावी नव्हे; तर फिक्स आमदार’ असे लिहिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांचे नाव निश्चित झाले आहे का, अशी चर्चा आता बारामतीत आहे. आज लागलेल्या बॅनरमुळे तर उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून मी सहा ते सात वेळा निवडून आलो आहे, त्यामुळे मला रस नाही, असे विधान केले होते, त्यामुळे बारामतीतून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचे नाव चर्चेत आले होते.

त्यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी बारामतीच्या उमेदवारीचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड आणि बारामती मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते घेतील, असे म्हटले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

अजित पवार यांनी बारामतीच्या उमेदवारीसंदर्भात पार्लमेंटरी बोर्डाकडे बोट दाखवले असले तरी खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवार आमचे नेतृत्व आहे आणि ते विधानसभेच्या निवडणुकीत असतील, असे म्हटले होते, त्यामुळे बारामतीतून नक्की कोण निवडणूक लढवणार, याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT