Madha Assembly Constituency : माढ्यातून यंदा विधानसभेला तुतारीच वाजणार; रोहित पवारांचा कॉन्फिडन्स

Rohit Pawar Confidence : माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छूक दिसून येत आहेत.
Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 August : माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छूक दिसून येत आहेत. आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनीही शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यावर बोलताना रोहित पवारांनी ‘विधानसभा निवडणुकीत यंदा माढ्यातून तुतारीच वाजणार’, असा विश्वास व्यक्त केला आहे.

माढ्यातून (Madha) निवडणूक लढविण्यासाठी आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे (Dhanraj Shinde) यांनीही पवारांची भेट घेतली.

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनीही माढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे संजय कोकाटेही इच्छूक आहेत. त्यामुळे तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार?, अशी चर्चा रंगली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे का?, असा प्रश्न जेव्हा रोहित पवार यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातसुद्धा मीच उमेदवार असेल, हे सांगण्याचा मला अधिकार नाही. इथं येऊन कधी कधी अडचणी होता, समजून घ्या आम्हाला. आम्हाला नाव सांगायचं असतं. पण, ते नाव सांगता येत नाही. असंच इतर ठिकाणीही आहे. शेवटी उमेदवाराचे नाव हे शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे सांगतील. कारण पक्षात त्यांना तो अधिकार आहे.

Rohit Pawar
Atul Benke : जुन्नरमध्ये पवारांनी अतुल बेनकेंना भेट नाकारली? रिॲलिटी फॅक्ट काय? जाणून घ्या...

प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने संविधानाच्या बाजूने राहिले पाहिजे. मागील २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले, त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी खाल्ली, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपचे लोक निवडून येणार असतील तर लोक बोलणार ना. कदाचित भाजपनेच काय केले का? अशा प्रकारांमधून भाजपलाच मदत होते का? असे प्रश्न लोक करायला लागले.

Rohit Pawar
Eknath Shinde Group : शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याचे वाद्‌ग्रस्त विधान; महिलांना रिव्हॉल्व्हरची परवानगी द्यावी, त्यात 2-4 चांगले लोक मेले तरी चालतील’

प्रकाश आंबेडकर ज्या कुटुंबातून येतात आणि असे प्रश्न जेव्हा त्यांच्याबाबत करायला लागतात, तेव्हा आम्हाला वाईट वाटतं. संविधान टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकरसुद्धा लढतात. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपला फायदा होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षानेसुद्धा ती घेतली पाहिजे, अशी नागरिक आणि मतदारांची भावना आहे, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com