Chandrakant Patil-Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Fadnavis BJP National President : ‘ती’ बातमी ऐकूनच चंद्रकांतदादांना आनंद झाला; म्हणाले, ‘आता व्हेरिफाय करतो’

Chandrakant patil On BJP National President : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष बदलाच्या चर्चांना मोठं उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाजप अध्यक्षपदासाठी अग्रभागी असल्याचे बोलले जात आहे.

Sudesh Mitkar

Pune, 01 August : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची आणि महायुतीची पीछेहट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यावेळी पक्ष संघटनेकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसला तरी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष बदलाच्या चर्चांना मोठं उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव भाजप (BJP) अध्यक्षपदासाठी अग्रभागी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख पुतळा सारसबाग येथे जाऊन अण्णाभाऊंना अभिवादन केलं. शहरातील एक हजार मंडळांनी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्याचे ठरवलं आहे. त्यातील 20, 22 ठिकाणी मी जाणार आहे.

कष्टकराच्या मनातला न्यूनगंड संपवण्याचे काम अण्णाभाऊंनी केलं आहे. मातंग समाजातील मुलांना शिक्षण, व्यवसायासाठी आर्टीकडून मदत मिळणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, बऱ्याच बातम्या माध्यमांकडूनच कळतात. आता ही बातमी कळली असून ती व्हेरिफाय करतो. फडणवीसाचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी येत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक एक पायरी पुढे जायचे असते. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील, तर आम्हा सर्वांना आनंद आहे, त्यांच्यात ते गुण नक्की आहेत. केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला तर ती आमच्या दृष्टीने सर्वांत आनंदाची गोष्ट आहे.

उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यसंदर्भा चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात जास्त त्रागा व्यक्त करत आहेत. माणसांनी तेच बोलावं; पण व्यवस्थित बोलावं. उद्धव ठाकरे जे बोलले आहेत, त्याची प्रतिक्रिया सामान्य माणसातून येणार आहे.

एकनाथ शिंदेंनी तुम्हाला दगा दिला की, तुम्ही अन्याय करत होता. जनतेच्या समोर आहे. त्यांचा आत्मा असलेले हिंदुत्व तुम्ही दाबत होता त्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेतला. पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तो खरा टर्निंग पॉईंट ठरला. तो प्रसंग एकनाथ शिंदे यांना वेगळा निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा ठरला, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

सुजय विखेंचा निर्णय पक्ष घेईल

सुजय विखे यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेवरही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपमध्ये कोणीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. मात्र, त्याचा निर्णय हा पक्ष घेत असतो, त्यानुसार जर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर पक्ष त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT