BJP : कसबा मतदार संघातून पाच वेळा आमदार झालेले गिरीश बापट (Girish Bapat) यांची सध्या प्रकृती ठीक नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीपासून दूर रहाणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच घोषीत केले होते. दरम्यान या मतदारसंघातील चुरश चांगलीच वाढली आहे.
त्यामुळे बापट यांना निवडणुकीपासून दूर ठेवणे परवडणार नाही, याची जाणीव भाजप पक्षश्रेष्ठींना झाली. त्यानंतर भाजपच्या गोटात हलचाली झाल्यानंतर काल केसरीवाड्यात बापट यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला. त्यानंतर आज त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे बापट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात सध्या पोटनिवडणुकीची चुरश वाढली आहे. Kasba Bypoll Election भाजपसाठी येथील गुंता वाढल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Devendra Fadnavis), पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह इतर नेते पुण्यात तळ ठोकून आहेत. असे असतानाही कसब्याचे किंगमेकर गिरीश बापट (Girish Bapat) यांची उणीव पक्षनेतृत्वाला झाली. मात्र त्यांनी यापूर्वीच निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान ब्राम्हण समाजाचा रोष वाढल्याने भाजपचेही टेन्शन वाढले.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच बापट यांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बापट यांनी काल केसरीवाड्यात (Kesariwada) मेळाव्याला हजेरी लावली. ते व्हीलचेअरवर होते. त्यांच्या नाकाला ऑक्सीजन नळी होती.
अशा अवस्थेत त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. तसेच कार्यकर्त्यांना भाजपला निवडून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. यानंतर आज त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना आठवड्यातून दोनवेळा डायलिसिस करावे लागते. त्यामुळे बापट सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात. परंतु, काल त्यांनी पक्षासाठी कसब्याच्या प्रचारात सहभाग घेतला.
तेथे त्यांनी भाजपचा विजय होईल. विजयाचे पेढे भरवायला मीच येईल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी हेमंत रासने (Hemant Rasane) यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचेही आवाहन केले.
प्रचारात सहभाग घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. त्यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.