Baramati news : बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे बारामतीत दाखल झाले आहेत. याच मेळाव्याला संसद सदस्य या नात्याने ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा नमो महारोजगार मेळावा बारामतीत (Baramati) सुरू आहे. या कार्यक्रमासाठी सुरुवातीला खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना निमंत्रण नव्हते. मात्र, प्रशासनाने चूक सुधारत शुक्रवारी पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकले हेाते. त्यानंतर पवार यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. पवार आज कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने सुळे या उपस्थित आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
नमो महारोजगार मेळाव्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे, सुनेत्रा पवारही व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यामुळे महारोजगार मेळाव्यात ते मान्यवर काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.