Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : केवळ भीतीपोटी पवारांनी फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही; बावनकुळेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : २०१९ मध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जनतेने १६५ आमदारांच्या माध्यमांतून कौल दिला होता. उद्धव ठाकरे यांनीही फडणवीस यांना मुख्यमंत्री करू, असे म्हणत आपले आमदार निवडून आणले. मात्र एका नेत्यास फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपला पक्ष संपण्याची भीती वाटली. त्यानंतर जे घडले त्यातून १०५ आमदार असलेला पक्ष विरोधात बसला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

पुण्यातील सकल ब्राम्हण समजाच्या स्नेहमेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे (Chendrashekhar Bawankule) बोलत होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर गंभीर आरोप केले. बावनकुळे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. त्यांचा कामाचा झपाटा मोठा आहे. २०१४-२०१९ या त्यांच्या मुख्यमंत्री काळात राज्याने अनुभवले. याचा धसका विरोधकांनी घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये जनतेने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी महायुतीला कौल दिला. राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांना मात्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नको होते. तसे झाले असते तर पवार यांना राष्ट्रवादी पक्ष संपेल, याची भीती होती. त्यातूनच महाविकास आघाडी स्थापन होऊन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले."

ब्राम्हण समजाबाबत (Brahmin Community) विरोधक खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, "कोण म्हणत ब्राम्हण समाज मतदान करणार नाही. कोण म्हणतं ब्राम्हण समाज नाराज आहे. कसब्यात त्या स्वरुपाचे पोस्टर लावून विरोधाकांनी ब्राम्हण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कसब्यातून राज्याला, देशाला दिशा देण्याचे काम झाले आहे."

यानंतर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "कोरोना काळात उद्धव ठाकरे आणि अजित पवार घरात बसून होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आयसीयू विभागांना भेटी देत होते. तत्कालीन सरकारने हिंदू सोडून इतर धर्मांची श्रद्धास्थळे उघडली. दारुची दुकानेही उघडली. मंदिर उडण्यासाठी मात्र भाजपला आंदोलन करावे लागले."

अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनाकाळात हात झटकल्याचा आरोप केला. बावनकुळे म्हणाले, "नागरिकांचा जीव आणि सार्वजनिक मालकमत्ता वाचविणे हे सरकारचे पहिले प्राधान्य असते. कोरोनात लसीकरणाची वेळ आली त्यावेळी अजित पवार म्हणाले ते काम केंद्राचे आहे. त्यावेळी जगही भारताला घाबरवत होते. मोदींनी मात्र धाडसाने प्रयत्न करून आज १३० कोटी जनतेच्या तोंडावरील मास्क काढला आहे. ते अमेरिका, चीन आणि जपानलाही जमले नाही."

सध्या चिंचवड आणि कसब्याची निवडणूक (By election) भाजपने प्रतिष्ठेची केल्याचा आरोप होत आहे. या निवडणुकीमुळे राज्य सरकार पडणार नाही. ते आता मजबूत आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठे नाही. तर देश, देव, धर्म, संस्कार, संकृती टिकविण्यासाठी आणि असूरी शक्ती दूर ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

गिरीश बापट (Girish Bapat) प्रचारात दिसल्याने विरोधाकांवर सर्व बाजूने टीका करण्यात आली. यावेळी बावनकुळे यांनी सांगितले, "बापट यांनीच मतदारांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना मनाई केली असता त्यांनी एकदा तरी मला बाहेर काढा, असे ते म्हणाले. यातून बापट यांनी आपले कर्तव्य निभावले आहे. तसेच शैलेश टिळक यांनी हेमंत रासने यांच्यासाठी सर्वात जास्त काम करणार असल्याचे म्हणालेत." यानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांच्या कामाचेही कौतूक केले.

काश्मीरमधील कलम ३७० हटलविले तर तेथे रक्ताचे पाट वाहतील असे असुरी शक्तीच्या सरकारमधील लोक म्हणत होते. त्यास मोदी-शाह यांनी खोटे ठरविले आहे. पूर्वी काश्मीरात दरवर्षी २२ लाख पर्यटक जात होते. यावर्षी तेथे तब्बल १ कोटी ६० लाख पर्यटकांनी भेट दिल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT