PCMC Latest News Sarkarnama
पुणे

PCMC News : 13 निष्पाप जीव गेल्यानंतर पिंपरी महापालिकेला आली जाग; आता बर्निंग वॉर्ड तयार करणार

Burning Ward Issue : महापालिका स्थापन होऊन साडेतीन दशके उलटल्यानंतर सुद्धा पिंपरी-चिंचवडमध्ये बर्निंग वॉर्ड नाही.

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये तळवडे येथील शिवराज एंटरप्रायजेस या स्पार्कल मेणबत्ती बनविण्याच्या बेकायदेशीर कारखान्यात ८ तारखेला दुपारी स्फोट होऊन त्यात त्यात 13 निष्पाप जीवांना प्राण गमवावे लागले. या भयंकर आगीत 13 हून अधिक लोकांचे मृत्यू झाल्यानंतर उशिराचे शहाणपण सुचलेल्या पिंपरी महापालिकेने आता शहरात 15 ते 30 बेडचा बर्निंग वॉर्ड तयार करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

महापालिका स्थापन होऊन साडेतीन दशके उलटल्यानंतर सुद्धा पिंपरी-चिंचवडमध्ये बर्निंग वॉर्ड नाही.त्यामुळे या काळात गंभीर भाजल्याने अनेकांचे जीव गेले आहेत.त्यानंतरही हा वॉर्ड शहरात सुरु करण्यात आला नव्हता. एमआयडीसी असूनही तिचा एसटीपी नसल्याने शहरातून वाहणाऱी पवित्र इंद्रायणी तसेच पवना या नद्या अतिप्रदूषित होऊन त्या गटारगंगा झाल्या आहेत. त्याचप्रकारे भाजून अनेक जीव जाऊनही महापालिका प्रशासनाला शहरात बर्निंग वॉर्ड सुरु करण्यात अपयश आलेले होते म्हणजे आहे. त्यामुळे गंभीर भाजलेल्यांना पुण्यात घेऊन जावे लागते.(PCMC)

तळवड्याच्या अनधिकृत कारखान्यातील आगीच्या ताज्या घटनेतील भाजलेल्यांनाही पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दिवशीच (ता.8) बर्निग वॉर्डअभावी भाजलेल्या रुग्णांची कशी होरपळ आणि ससेहोलपट होत आहे, याची बातमी सरकारनामाने दिली. त्याची लगेच प्रशासनाने दखल घेतली.

दरम्यान, शहरातील आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) आणि उमा खापरे यांनी हा प्रश्न विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला.त्यामुळे प्रशासन आणखी वेगाने हलले. त्यांनी असा वॉर्ड तयार करण्याच्या हालचाली सुरु केल्या.तो तयार करणार असल्याचे असल्याचे जाहीरही केले. पण शहरातील कुठल्या पालिका रुग्णालयात तो सुरु करणार हे,मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बर्निंग वॉर्ड तयार करण्याच्या पालिकेत काल झालेल्या बैठकीत कुठल्या रुग्णालयात तो सुरु करायचा याचा अहवाल सादर करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह (Shekhar Singh) यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.त्यानंतर तो सुरु केला जाणार असून तेथे उपचार आणि रुग्णांचे पुनर्वसन करण्यावर भर दिला जाणार आहे.

याचवेळी सुमन गोधडे (वय 40) या आणखी एका जखमींचे शनिवारी ससूनमध्ये निधन झाल्याने तळवडे अग्निकांडातील बळीचा आकडा 13 झाला. अद्याप तेथे उषा पाडवी, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर उपचार सुरू आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT