Pune News : एसटीने प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीटाची सुविधा दिली जाते. त्याप्रमाणे आता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता अर्ध्या तिकीट दरात प्रवास करता येणार आहे.
दैनिक पासनंतर आता तिकीट दरातदेखील ज्येष्ठांना सवलत देण्यात आली आहे. रविवार (ता. १) पासून याची अंमलबजावणी होणार असून, यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाने यापूर्वीच ज्येष्ठ नागरिकांसाठी ३५ रुपयांचा सवलतीचा दैनिक पास सुरू केला आहे. आता प्रशासनाने दैनंदिन तिकीट दरातही ५० टक्के सवलत लागू केली. त्यामुळे ज्या ज्येष्ठांना केवळ एकाच मार्गावर किंवा कमी अंतराचा प्रवास करायचा आहे, त्यांना संपूर्ण दिवसाचा पास काढण्याऐवजी आता थेट अर्ध्या दरात तिकीट मिळणार आहे. सर्व बस मार्गांवर ही सवलत लागू असणार आहे.
अर्ध्या तिकीटात प्रवासाच्या सवलतीसाठी ओळखपत्राची अट असणार आहे. प्रवास करताना वाहकाकडे वयाचा पुरावा दाखवणे बंधनकारक असणार आहे. यासाठी प्रवाशांना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ‘पीएमपी’ने दिलेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, आधार कार्डवर जन्माची संपूर्ण तारीख (दिवस, महिना, वर्ष) असणे अनिवार्य आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.