IAS Pooja Khedkar-Suhas Diwase Sarkarnama
पुणे

Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या; पुणे पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Sachin Waghmare

Pune News : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे पुणे पोलिसांचे आदेश आहेत. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर याच बाबतीत वाशीम पोलिसांनी खेडकर यांची स्टेटमेंट नोंदवली होती. ही स्टेटमेंट आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. याच चौकशीसाठी पूजा खेडकर (Pooja Khedekar)यांना हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यामुळे गुरुवारी आता पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे पुणे पोलिसांचे आदेश दिले आहेत. (Pooja Khedkar News)

वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची भेट घेतली. मी माझ्या कामासाठी आले आहे मी बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. दोन दिवसांपूर्वी तीन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती. पूजा खेडकर यांनी आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस चौकशीसाठी आले होते.

दुसरीकडे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर ह्या अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव या गावाच्या रहिवासी आहेत. त्यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedekar)या गावच्या माजी सरपंच आहेत. तर वडील दिलीप खेडकर नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीत उभे होते. मात्र, खेडकर कुटुंबावर जाणीवपूर्वक आरोप करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे, असे ग्रामस्थ सांगत आहेत.

दरम्यान, त्यातच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे महापालिकेने अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. महापालिकेकडून मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिटकवली होती. त्यानंतर आता ते अतिक्रमण हटवण्यात आले आहे.

पुणे महापालिकेने हे अतिक्रमण सात दिवसात न हटवल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील त्यात नमूद केले होते. फुटपाथवर साठ फूट लांब तीन फूट रुंद आणि दोन फूट उंचीचे बांधकाम करण्यात आले होते. याबाबत पथविभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली होती. बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही नोटीस चिटकवली होती. त्यानंतर खेडकर कुटूंबाने हे अतिक्रमण स्वतःहून बुधवारी हटवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT