Porsche Accident Shivani Agarwal Sarkarnama
पुणे

Porsche Accident Update : कल्याणीनगर घटनेत 'खून का कर्ज' आरोपीची आई शिवानी अगरवाल यांची मोठी कबुली

Shivani Agarwal confessed : अल्पवयीन आरोपी मुलाला वाचविण्यासाठी शिवानी अगरवाल यांनी स्वता:चे रक्त दिले, पोलिसांच्या तपासात दिली धक्कादायक कबुली..

Sudesh Mitkar

Pune Porsche Accident News : दारुच्या नशेत 'धूम' स्टाइल ड्रायव्हिंग करीत दोघांना चिरडलेल्या कल्याणीनगर अपघाताच्या घटनेत शिवानी अगरवालांच्या अटकेने आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली असून, ससूनमध्ये अल्पवयीन मुलाच्या 'ब्लड टेस्ट'साठी त्याच्या आईने अर्थात, शिवानी अगरवाल यांनी रक्त दिल्याची कबुली त्यांनीच दिली आहे. त्यामुळेच अल्पवयीन मुलाचे दारु प्यायली नसल्याचा रिपोर्ट देण्यात आल्याचेही या निमित्ताने उघड झाले.त्यामुळे कल्याणीनगर अपघाताची घटना आता एका अर्थाने 'खून का कर्ज' असल्याचे समोर आले आहे.

कल्याणीनगर येथे अपघात झाल्यानंतर या अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल हे दोघेही ससूनमध्ये उपस्थित होते, असे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले आहे. ज्या मध्यरात्री हा अपघात झाला होता, त्यावेळी माझा मुलगाच गाडी चालवत होता, याची कबुली देखील या अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी दिली आहे.त्यामुळे या केसमधील अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास पुढील काळात मदत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भरधाव वेगाने पोर्श कार चालवित या अल्पवयीन मुलाने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, गाडीवर बसलेली तरूणी 15 ते 20 फूट उंच उडून रस्त्यावर पडली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. तर गाडी चालविणारा तरूण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. रूग्णालयात जाताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कार चालविणाऱ्या या अल्पवयीन मुलाला कारच्या बाहेर काढून स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मुलावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी सुरूवातीपासूनच पोलिसांसह कोर्ट (Court) तसेच विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जात होता. या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने अवघ्या 15 तासातच जामीन मंजूर केला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष देखील निर्माण झाला होता.

या मुलाच्या रक्तामध्ये दारुचे अंश सापडू नये, यासाठी ससून रूग्णालयातील डॉक्टरांनी या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह एका शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. ससूनमध्ये ज्यांचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले त्यामध्ये एका महिलेचे रक्त असल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण घडामोडींमध्ये या अल्पवयीन आईचा देखील सहभाग असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल यांना पोलिसांनी (Police) अटक केली. त्यानंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या आईची बालसुधारगृहात समोरासमोर चौकशी पोलिसांकडून करण्यात आली.

या अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष परवानगी काढली होती. या चौकशीत सुरूवातीच्या काळात आई शिवानी अगरवाल आणि तिच्या लाडक्या बाळाने चुकीची उत्तरे दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर आरोपीच्या आई शिवानी यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी माझा मुलगा चालवत होता आणि ते रक्त मी स्वतः दिलं असल्याचं पोलिसांच्या चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं असल्याचं समोर आलं आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT