Sharad Pawar, Prakash Ambedkar sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar News : 'त्या' भेटीचे गुपित प्रकाश आंबेडकरांनी केले उघड!

Sharad Pawar : वंचित बहुजन आघाडीच्या 'इंडिया' आघाडीतील समावेशावर निर्णय झाला नाही.

Roshan More

Pune : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. मात्र, तो आता इतिहास झाला आहे. कारण राज्याच्या राजकारणातील नवीन समीकरणामध्ये आंबेडकर-पवार यांची जवळीक वाढलेली पाहायला मिळत आहे. प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती. या भेटीवर प्रकाश आंबेडकर आता उघडपणे बोलले आहेत.

एखाद्या भेटीविषयी तर्कवितर्क करायला नको. आता आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा समावेश आहे. त्यामुळे यापुढेही शरद पवार यांची भेट आणि बैठका होत राहणार आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. या भेटीवर आधी प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी आपले नातेवाईक मोदी बागेत राहत असल्याचे सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'इंडिया' आघाडीत समावेश कधी?

इंडिया आघाडीत समावेशासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले होते. मात्र, अजूनही 'वंचित'च्या 'इंडिया' आघाडीतील समावेशावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे 'इंडिया' आघाडीत आपल्या प्रवेशाला कोणाचा विरोध आहे, हे माहीत नाही. मात्र, 'इंडिया' आघाडातील समावेशाबाबत त्यांनीच ठरवायचे आहे. आता तरी आमच्यासाठी दार बंद आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

'वंचित'चा फाॅर्म्युला मान्य होणार?

महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवण्याचा फाॅर्म्युला वंचित बहुजन आघाडीकडून मांडण्यात आला आहे. या फाॅर्म्युलावर अजून महाविकास आघाडीकडून चर्चा झाली नाही. पण ज्याची जिथे जास्त शक्ती तेथे त्यांचा उमेदवार हे ठरलं आहे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. लवकरच जागांच्या वाटपावर चर्चा होईल, असे देखील राऊत म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT