Pune News : भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलनाच्या माध्यमातून सत्ता उलथून टाकली आहे. भारतात देखील सरकारच्या ध्येय-धोरणामुळे अशीच परिस्थिती उद्भवू शकते अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यकर्ते घाबरले असून पुढील दोन महिन्यात नेपाळसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असं त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हटलं.
आंबेडकर म्हणाले, "सध्या राज्यकर्ते घाबरलेले आहेत. त्यामुळं राज्यकर्त्यांच्या घाबरटपणाचा फायदा आपण घेतला पाहिजे असा सल्ला मी विद्यार्थ्यांना दिला आहे. पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा सल्लापण दिल्याचं त्यांनी सांगितलं. पीएचडीचे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये उपोषणाला बसले आहेत. तीन दिवस झाले तरीही पोलिसांनी त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे दखलपात्र गुन्हा करणे आवश्यक असून त्यासाठी मंत्रालयासमोर शांततेने आंदोलन करणे आवश्यक असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सध्याचे राज्यकर्ते जर सुधारले नाहीत तर मला दिसत आहे की दोन महिन्यांमध्ये नेपाळ सारखे परिस्थिती आपल्याकडे देखील उद्धवू शकते, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. अमेरिकेसोबतच्या विदेश धोरणाबाबत केंद्र सरकार भारतीयांना गंडवत आहे. अमेरिकेनं लादलेली 50 टक्के टॅरिफ जर कामी झालं नाही तर सध्या जी आकडेवारी समोर येत आहे. त्यानुसार टेक्स्टाईल इंडस्ट्रीतील एक कोटी दहा लाख कर्मचारी बेरोजगार होतील. तसेच गुजरातमध्ये असलेली जेम्स आणि ज्वेलरीच्या उद्योगांमध्ये देखील दहा लाख कर्मचारी बेरोजगार होतील.
50 टक्के टॅरिफमध्ये जर कोणतीही सूट मिळाली नाही तर त्याचे भीषण परिणाम होतील आणि ते परिणाम आता दिसू लागले आहेत. आयटी क्षेत्रामध्ये देखील टॅरिफ लावण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये देखील बेरोजगारी वाढेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टींमध्ये शासन जेवढ्या लवकर सुधारणा करेल तेवढी देशात शांतता राहील. नाहीतर आपण अशांततेकडे जाऊ अशी भीती अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे अमेरिकेने लादलेल्या टेरिफमुळे भारतामध्ये नेपाळसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.