Pune BJP
Pune BJP Sarkarnama
पुणे

Pune BJP : राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पुणे भाजपची जय्यत तयारी; दोन लाख घरांपर्यंत अक्षता पोहचवणार!

मंगेश कोळपकर : सरकारनामा ब्यूरो

Pune News : अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्याची तारीख आता जवळ आली आहे. 22 जानेवारी 2024ला हा दिमाखदार आणि ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात भाजपकडून(bjp) लोकार्पण अक्षतांचे वाटप करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे भाजपनेही एक संकल्प केला आहे.

श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या मंगल अक्षता भाजपचे जवळपास दहा हजार रामसेवक पुण्यातील दोन लाख घरांपर्यंत पोहचवणार आहेत. अशी माहिती पुणे भाजप शहाराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, भाजपकडून 1 ते 15 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, यासाठी मतदारसंघनिहाय नियोजन बैठकाही होणार आहेत. पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाला कार्यक्रमात सहभागी होता यावे, यासाठी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.'', अशी माहिती शहाराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.

यासंदर्भात झालेल्या बैठकीत शहाराध्यक्ष धीरज घाटे(Dheeraj Ghate) यांनी सांगितले, ‘‘अयोध्येत श्री रामाचे मंदिर व्हावे ही प्रत्येक हिंदूंच्या मनातील भावना 22 जानेवारीला खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. या मंदिराचे भव्य पुनर्निर्माण हा एक संपूर्ण देशासाठी गौरवशाली क्षण असून त्या दिवशी संपूर्ण भारतात तसेच जगात दिवाळीचे वातावरण असेल.''

या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह सचिन भोसले, सहकार्यवाह महेश पोहोनेरकर , धनंजय काळे , प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रीय पदाधिकारी मेधा कुलकर्णी , पुणे शहर प्रभारी माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्ष डहाळे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले , प्रवक्ते संदीप खर्डेकर , हेमंत रासने, सरचिटणीस पुनीत जोशी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT