Congress News :  Sarkarnama
पुणे

Pune Congress News : '...त्यांनी खुशाल भाजपात जावे'; पुणे काँग्रेसच्या भर बैठकीत कुणाला सुनावले?

Chaitanya Machale

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने राम मंदिराच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाचा लोकसभा निवडणुकीचा अजेंडा सेट केला आहे. अयोध्या येथे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ या निमित्ताने फोडला आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांनी एकत्रित येऊन आता केंद्रात भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच अन्य मित्र पक्षांनी एक होत येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याचा संकल्प सोडला आहे. पुढील काही महिन्यातच येत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही राज्यातील लोकसभा जागांचा आढावा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रभारी पश्चिम महाराष्ट्रातील रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस भवन येथे झालेल्या या बैठकीत पुन्हा एकदा पदाधिकार्‍यांमधील धूसफूस चेन्नीथला यांच्या समोरच उघड झाल्याचे पहायला मिळाले. या बैठकीत काही पदाधिकार्‍यांनी निवडणूकांच्या तोंडावर अनेकजण भाजप मध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. त्यावर प्रभारी चेन्नीथल यांनी थेट वक्तव्य केले. ते म्हणाले, 'ज्यांची मर्जी आहे, त्यांनी भाजप मध्ये खुशाल जावे. ज्यांची विचारधारा काँग्रेसची आहे ते पक्ष कधीच सोडणार नाही. मात्र, जे जातील त्यांच्या विरोधात आम्ही काँग्रेस म्हणून लढू 'असा सूचक इशारा त्यांनी दिला. पक्षाकडून जी बूथ कमिटीची यादी दिली आहे. ती यादी खरी की खोटी हे आपण स्वत: फोन करून तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाचे काम शिस्तीत करा. पक्षाच्या विरोधात जे काम करतील तसेच ज्यांच्यामुळे पक्षाच्या भूमिकेला तडा जाईल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, शब्दात त्यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांची शाळा घेतली. या बैठकांसाठी संपूर्ण दिवसभर काॅग्रेसभवन मध्ये गोंधळाचे वातावरण दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आमदार विश्वजित कदम, रविंद्र धंगेकर, बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत चेन्नीथला यांनी पक्षाची ध्येय धोरणे यासह पक्ष शिस्त, या बाबत मार्गदर्शन केले. तसेच बुथ कमिटीच्या कामाचा आढावा घेतला. येणाऱ्या लोकसभेसाठी तयारी ठेवावी अशा सूचनाही पदाधिकाऱ्यांना केल्या. जे पक्षाचे काम करणार नाहीत त्यांना घरी बसवले जाईल असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT