Pune Crime_Budhvar Peth Pattern 
पुणे

Pune Crime : सेक्स वर्करकडं गेला तर घरापर्यंत पाठलाग! पुण्यात ब्लॅकमेलिंगच्या 'बुधवार पेठ पॅटर्न' मुळं खळबळ

Pune Crime : या नव्या प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला कोणी बळी पडलेलं असेल तर त्यांनी पोलिसांशी तातडीनं संपर्क साधावा त्यांचं नाव गुपित ठेवण्यात येईल असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Sudesh Mitkar

Pune Crime : सोशल मीडिया आणि ऑनलाईन माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचे प्रकार दररोज समोर येत असतात. मात्र, आता पुण्यात पैसे उकळण्याच्या एका विचित्र पॅटर्नचा भांडाफोड झाल्यानं खळबळ उडाली आहे. हा पॅटर्न म्हणजे 'बुधवार पेठ पॅटर्न' म्हणून चर्चेत आला आहे. यामध्ये सेक्स वर्कर्सकडं गेलेल्या लोकांचा घरापर्यंत पाठलाग करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या या प्रकारामुळं चांगलीच खळबळ माजली आहे.

नेमका प्रकार काय?

पोलिसांनी नांदेड सिटी परिसरातून दोन तरुणांना अटक केली आहे. हे तरुण बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्सच्या वस्त्यांजवळ फिरतीवर असायचे या ठिकाणी जाणारं एखादं सावज ते हेरायचे, त्यानंतर त्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा पाठलाग करत ते त्याच्या घरापर्यंत पोहोचायचे. त्यानंतर घराजवळील लोकांना हे फोटो किंवा व्हिडिओ दाखवण्याची भीती घालून तसंच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळायचे. हा उद्योग गेल्या अनेक काळापासून या तरुणांकडून सुरु होता.

आयटी इंजिनिअरला केलं टार्गेट

अशाच प्रकारे नांदेड सिटी परिसरातील एका आयटी इंजिनियरचा पाठलाग या दोन आरोपींनी केला. हा तरुण नांदेड सिटीतील आपल्या घराजवळ पोहोचल्यानंतर आरोपींनी त्याला अडवत त्याच्याकडून पैशाची मागणी केली. त्यावेळेस त्या आयटी इंजिनियरच्या घरी पत्नी व इतर कोणीही नव्हतं. त्यामुळं त्या तरुणानं पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तू आमच्याकडून वीस हजार रुपये रोख घेतले असून ते आता ऑनलाईन स्वरूपात आम्हाला परत देणार होतास. हे पैसे परत कर अन्यथा आम्ही पोलिसांकडे तक्रार करुन तुझे बुधवार पेठेत गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्याकडं देऊ तसंच तुझी बदनामी करू अशा पद्धतीनं त्याला धमकावण्यात आलं. इतकं करूनही तो आयटी इंजिनियर ऐकत नाही म्हटल्यावर त्या आरोपींनी पोलिसांच्या हेल्पलाइनवरती फोन करत तक्रारी देण्यास सुरुवात केली. आमचे 20,000 रुपये या व्यक्तीने घेतले असून ते परत द्यायला तयार नाही, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली.

यानंतर नांदेड सिटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सुरुवातीला पोलिसांना या टोळीचा संशयही आला नाही. उलट निरपराध व्यक्तीलाच पोलिसांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. पण त्यानंतर एका स्थानिक पत्रकाराच्या मदतीनं संबंधित तरुणानं याबाबत सर्व गोष्टी तपशीलवार समोर मांडल्यानंतर पोलिसांनी शहानिशा केली असता आरोपींचा सगळा बनाव समोर आला.

असा झाला भांडाफोड

या प्रकरणी पोलिसांनी आयुष राजू चौगुले, सदफ पठाण अशा दोन तरुणांना अटक केली आहे. या आरोपींनी अशाच प्रकारे धमकावून इतरही अनेक जणांना लुटलं असण्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळं आणखी किती जणांची यामध्ये फसवणूक झाली असेल याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी इतर कोणासोबत अशा प्रकारची गोष्ट घडली असल्यास त्यांनी पोलिसांनी याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तक्रार दाखल करणाऱ्याची ओळख लपवण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT